शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

 वादग्रस्त वक्तव्यामुळे हरीश पिंपळे अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:59 PM

संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने एकत्र येऊन मूर्तिजापूर येथे तिडके नगरमध्ये निषेध सभा घेतली.

मूर्तिजापूर: विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाषणादरम्यान आमदार पिंपळे यांची वाणी घसरली आणि त्यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करून अवमानजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने एकत्र येऊन मूर्तिजापूर येथे तिडके नगरमध्ये निषेध सभा घेतली. या वेळी सकल मराठा समाजाच्या बॅनरखाली एकत्र येत मराठा समाज बांधवांनी तीव्र शब्दात निषेध करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी आमदार हरीश पिंपळे यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. सभेत अकोल्याचे मनीष मोहोड, पंकज जायले, मंगेश काळे, दिलीप बोचे, आशीष पवित्रकार, किशोर मानकर यांच्यासह या तालुक्यातील व बार्शीटाकळी तालुक्यातील शेकडो समाजबांधव उपस्थित होते. पिंपळे यांच्या वादग्रस्त विधानाने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक होऊन एखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी डॉ. पुरुषोत्तम तायडे, पंकज जायले, डॉ. संजय धोत्रे, पवन महल्ले, डॉ. अशोक ओळंबे, मंगेश काळे व इतर उपस्थित होते. दरम्यानया संदर्भात आमदार हरिष पिंपळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचला नाही. पिंजर येथेही निषेधजिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याविषयी आमदार हरीश पिंपळे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा पिंजर येथील डॉक्टर असोसिएशनने निषेध केला आहे.आ. पिंपळे यांनी मूर्तिजापूर येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य केले. त्यामुळे डॉक्टर लोकांच्या भावना दुखावल्या असून, याचा निषेध करण्यात आला. यावेळी डॉ. शरदचंद्र लहाने, डॉ. राठोड, डॉ. गुल्हाने, डॉ. खान, चिल्होरकर, डॉ. एन. बी. पोटे, डॉ. नरेश इंगोले तथा डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Harish Pimpleहरिष पिंपळेAkolaअकोलाmurtizapur-acमूर्तिजापूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019