शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय राबविणार ‘हगणदारीमुक्त’ अभियान!

By admin | Updated: August 7, 2014 22:53 IST

सवरेपचारमधील शौचालयांचा बाहेरील व्यक्तींकडून वापर

अकोला: येथील वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात असलेल्या शौचालयांचा रुग्णालयातील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांव्यतिरिक्त आजूबाजूच्या परिसरातील २00 ते ३00 नागरिक वापर करतात. तसेच रुग्णालय परिसरात इतरत्र घाण करतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्यावतीने आता हगणदारीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे.सवरेपचार रुग्णालयात विविध वार्डांमध्ये अनेक शौचालय व स्नानगृह आहेत. ही शौचालये व स्नानगृह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या वापरासाठी बनविण्यात आली आहेत. शौचालयांची संख्या रूग्णालयातील रुग्णसंख्येच्या तुलनेत मुबलक आहेत. मात्र, दररोज सकाळी रुग्णांची शौचालय कमी असल्याची ओरड होते. रुग्णालयाच्या आजूबाजूने असलेल्या शौचालय व स्नानगृहांचा अन्य नागरिकच वापर करीत असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आले आहे. सकाळी रुग्णालयाच्या बाहेरील २00 ते ३00 व्यक्ती शौचालयाचा वापर करतात. तसेच रुग्णालयातील खुल्या जागेत शौचास बसतात. रुग्णांच्यासोबत त्यांचे चार ते पाच नातेवाईक असतात. हे नातेवाईकही रुग्णालयातीलच शौचालय व स्नानगृहांचा वापर करतात. रुग्णालयात वीस ते पंचवीस भिकारी व मतीमंद नेहमीच असतात. रुग्णालयात कोणत्याही परिसरात शौचास बसतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून, रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. ही बाब वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांच्या लक्षात आल्यावर यावर अंकुश मिळविण्यासाठी त्यांनी हगणदारीमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ** दोन चमू ठेवणार लक्ष हगणदरीमुक्त अभियानांतर्गत प्रशासनाच्यावतीने २५ जणांच्या दोन चमू तयार करण्यात येणार आहेत. या चमू पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत रुग्णालय परिसरात फिरून उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर कारवाई करणार आहेत. तसेच या चमू रुग्णालयातील शौचालयांचा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांव्यतिरिक्त कुणी वापर करतो का? याची पाहणी करून त्यांच्यावरही कारवाई करणार आहेत. ** अवैधरीत्या पैसे उकळतातरुग्णालयातील शौचालय व स्नानगृहांचा वापर करणार्‍यांकडून काही व्यक्ती अवैध पैसे वसुली करीत असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांच्या निदर्शनास आले. शौचास जाणार्‍याकडून पाच रूपये व स्नान करणार्‍याकडून दहा रुपये घेण्यात येत होते. रुग्णालय प्रशासनाकडून असा कोणताही ठेका देण्यात आला नव्हता. मात्र, काही नागरिक अनेक महिन्यांपासून अशाप्रकारे रुग्णांचे नातेवाईक व अन्य नागरिककांकडून पैसे उकळण्यात येत होते.