महान - अकोला मार्गावर अपघाताच्या घटना वाढल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:18 IST2021-08-01T04:18:35+5:302021-08-01T04:18:35+5:30

----------------------- पार्वताबाई मात्रे पणज : आकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील अशोकराव मात्रे यांच्या पत्नी पार्वताबाई अशोकराव मात्रे (४५) ...

Great - Accidents on the way to Akola increased! | महान - अकोला मार्गावर अपघाताच्या घटना वाढल्या !

महान - अकोला मार्गावर अपघाताच्या घटना वाढल्या !

-----------------------

पार्वताबाई मात्रे

पणज : आकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील अशोकराव मात्रे यांच्या पत्नी पार्वताबाई अशोकराव मात्रे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुले, सुना, नातू , पंतू असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

------------------

कपाशीचे नुकसान ; शेतकरी संकटात

सौदळा : सौदळा परिसरात पावसाने कहर केला असून, पिके पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांची शेती खरडून गेली असून, कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. (फोटो)

------------------

अंत्री मलकापूर येथे स्मशानभूमी नाही !

अंत्री मलकापूर : येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात अंत्यसंस्कार करताना अडथळा निर्माण होत आहे. याकडे लक्ष देऊन स्मशानभूमीचे कामे करण्याची मागणी होत आहे.

------------

श्री दासगिरी महाराज बनले मठाधिपती !

अंबोडा : कृष्णाई गौरक्षण अंबोडाचे व्यवस्थापक गुरुवर्य दासगिरी महाराज यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दि. २५ व २६ जुलै रोजी कृष्णाई गौरक्षणमध्ये महंताची दिक्षा समारंभ पार पडला. श्री दासगिरी महाराज यांनी मठाधिपती हभप ज्ञानेश्वर महाराज सामदा यांच्या हस्ते महंताची दिक्षा घेतली. स्वामी सुरेश्वरानंदजी गिरी असे नामविधीकरुन दासगिरी महाराजांना गौकृष्ण मठाचे मठाधिपती बनविण्यात आले. कोरोनाच्या नियमांचे पालन करून सोहळा उत्साहात संपन्न झाला. (फोटो)

Web Title: Great - Accidents on the way to Akola increased!