शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचे ‘ऑडिट’ रखडले!

By admin | Updated: September 5, 2014 01:40 IST

गेल्या चार वर्षांंंपासून अकोला जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींचे ‘ऑडिट‘ रखडले आहे.

संतोष येलकर /अकोलाग्रामपंचायतींच्या जमा-खर्चाबाबत लेखा परीक्षणासाठी (ऑडिट) स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाला अभिलेखे (रेकॉर्ड) उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने, गेल्या चार वर्षांंपासून जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींचे ऑडि रखडले आहे. ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड उपलब्ध करून न देणार्‍या संबंधित ग्रामसेवकांवर कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकार्‍यांना ग्रामसेवकांच्या नावांची यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणार्‍या योजना, विविध विकास कामे, त्यासाठी उपलब्ध होणारा निधी, कर वसुली आणि उपलब्ध निधीतून करण्यात आलेला खर्च यासंदर्भात दर तीन वर्षांंनी ग्रामपंचायतींच्या जमा-खर्चाचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. त्यानुषंगाने स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागामार्फत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या लेखा परीक्षणाचा (ऑडिट) कार्यक्रम गेल्या ऑगस्ट २0१0 पासून सुरू करण्यात आला होता. त्यानंतर जून २0१४ मध्येदेखील ग्रामपंचायतींच्या लेखा परीक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र जिल्ह्यातील ५४३ पैकी ४३ ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षणासाठी संबंधित ग्रामपंचायत सचिवांकडून स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाकडे उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षांंं पासून जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या जमा-खर्चाचे ऑडिट रखडले आहे. वारंवार कळविण्यात आल्यानंतरही लेखा परीक्षणासाठी अभिलेखे उ पलब्ध करून देण्यात आले नसल्याने, संबंधितांवर कारवाई करून, त्याबाबतची माहिती सादर करण्याबाबत स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाच्या सहायक संचालकांनी पाठविलेले पत्र गत ११ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना प्राप्त झाले. या पृष्ठभूमीवर ग्रामपंचाय तींच्या ह्यऑडिटह्ण साठी ह्यरेकॉर्डह्ण उपलब्ध करून न देणार्‍या संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करण्यासाठी संबंधित ग्रामसेवकांच्या नावांची यादी सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत गत १९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकार्‍यांना पत्राद्वारे देण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या ह्यऑडिटह्णसाठी ह्यरेकॉर्डह्ण उपलब्ध करून न देणार्‍या ग्रामसेवकांवर जिल्हा परिषदमार्फत कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.** रेकॉर्डअभावी ऑडिट रखडलेल्या ४३ ग्रामपंचायती!

* अकोला तालुका : गोरेगाव खुर्द, दुधाळा, कौलखेड जहाँ., वाशिंबा, कंचनपूर, शिवणी, लोणाग्रा, धामणा, चिखलगाव, कापशी तलाव.* बाळापूर तालुका : रिधोरा, जोगलखेड, खिरपुरी खुर्द, बारलिंगा, दधम बु.,गायगाव, मनारखेड, खामखेड.* तेल्हारा तालुका : सिरसोली, कोठा, अडगाव बु., शिवाजीनगर.* पातूर तालुका : चरणगाव, शेकापूर, गावंडगाव, तुलंगा खुर्द, तुलंगा बु., सावरगाव.* मूर्तिजापूर तालुका : बोर्टा, लोनसणा, शेलू नजिक, सांगवामेळ, अकोली जहॉगीर, दातवी, वीरवाडा, कवठा सोपीनाथ.* बाश्रीटाकळी तालुका : दगडपारवा, जलालाबाद, जांभरुण, भेंडी सुत्रक, जांबवसू, खेर्डा बु., वडगाव.