शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

धान्य घोटाळा : गोदामपाल मेश्राम निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:35 IST

अकोट येथील प्रकार : अपहारित धान्याची रक्कमही होणार वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोट शासकीय गोदामातील साठ्यामध्ये कमी आढळलेल्या गहू आणि तांदळासाठी जबाबदार धरून गोदामपाल मंगेश मेश्राम यांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी निलंबित केले. कमी आढळलेल्या धान्याचा अपहार समजून त्याची बाजारभावाने रक्कम वसुलीची कारवाईही केली जाणार असल्याची माहिती आहे. गोदामातील तपासणीत धान्यसाठा कमी असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते, हे विशेष. जिल्ह्यातील सर्वच गोदामांतील धान्य साठा तपासण्याचे आदेश प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी बैठकीत शुक्रवारी दिले होते. त्यानुसार अकोटचे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी अव्वल कारकून व्ही.डी. मोरे, कनिष्ठ लिपिक अविनाश जाधव यांच्यासह शनिवारी गोदामात धाव घेतली. दिवसभर केलेल्या तपासणीत गोदामातील त्या दिवशीच्या साठा नोंदीनुसार पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये गव्हाचा साठा २,४६० क्विंटल असल्याची नोंद होती. तपासणीत गहू २,३२४ क्विंटल असून, त्यापैकी १३५.५ क्विंटल गहू कमी आहे. तर तांदळाचा साठा ३३५ क्विंटलपैकी २९१ क्विंटल असून, ४३ क्विंटल कमी असल्याचे आढळून आले. तहसीलदारांच्या पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल शनिवारी सायंकाळीच जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. पुढील कारवाईचा प्रस्ताव पुरवठा विभागाने सोमवारी सकाळीच सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमानुसार गोदामपाल मंगेश मेश्राम यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. निलंबन काळात मेश्राम यांचे मुख्यालय मूर्तिजापूर तहसील ठेवण्यात आले आहे.