शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

महाप्रसादासाठी ११ बैलगाड्यांद्वारे केले जाते धान्य गोळा

By admin | Updated: January 5, 2017 02:11 IST

संग्रामपूर तालुक्यातील माहेर-सासर उत्सवाची शतकाची परंपरा.

वानखेड (जि. बुलडाणा), दि. ४- संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील जगदंबा देवस्थानाने देवीच्या माहेर-सासर उत्सवानिमित्त महाप्रसादाची आगळी अशी परंपरा जोपासली आहे. याअंतर्गत परिसरातील गावांमधून ११ बैलगाड्यांमधून धान्य गोळा केले जात असून, गोळा झालेल्या धान्यांचा १३ जानेवारी रोजी महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे. वानखेड येथील जगदंबा देवीच्या यात्रोत्सवास १0 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. तथापि, या यात्रोत्सवाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. दरम्यान, या उत्सवात देवस्थान श्री जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त देवीच्या गावाबाहेरील मंदिराचे प्रांगणात भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम ग्रामवासी व विश्‍वस्त मंडळाच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येतो. या महाप्रसादासाठी लागणारे गहू, ज्वारी, डाळ आदी धान्य गोळा करण्यासाठी वानखेड व दुर्गादैत्य या गावातून सजलेल्या बैलगाड्या वाजत गाजत फिरवून धान्य गोळा करण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे मंगळवारी ११ बैलगाड्या संपूर्ण गावातून फिरविण्यात आल्या व धान्य गोळा करण्यात आले. १३ जानेवारी रोजी दहिहांडी फोडण्यात येऊन भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. ११ बैलगाड्यांद्वारे धान्य गोळा करण्याची शतकाची परंपरा आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी गाववासी तसेच मंडळाचे पदाधिकारी प्रयत्नरत आहेत.- आनंदराव देशमुखअध्यक्ष, श्री जगदंबा देवस्थान, वानखेड ता. संग्रामपूर