शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

दोन पाणीपुरवठा योजनांसाठी ३२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे!

By admin | Updated: December 8, 2014 01:16 IST

अकोला शहर व खांबोरा पाणीपुरवठा योजनेचा समावेश.

अकोला: मोर्णा धरणातून अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मोर्णा ते महान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकणे आणि खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत चोहोट्टा बाजार ते घुसरपर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी, ३२ कोटी ६९ लाख ५५ हजार रु पयांच्या दोन पाणीपुरवठा योजनांचा शुक्रवारी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणासह इतर धरणांमध्येही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, मोर्णा धरणा तून अकोला शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने मोर्णा धरणा पासून महान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या योजनेसाठी २७ कोटी २0 लाख ११ हजार रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत तयार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातल्या ६४ गावांच्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी चोहोट्टा बाजार ते घुसरदरम्यान ३१५ मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकणे, पाणी शुद्ध करण्याचे पंप आणि ह्यव्हीटीह्ण पंप बसविण्याच्या कामासाठी ५ कोटी ४९ लाख ४४ हजार ७00 रुपयांच्या योजनेचा प्रस्तावदेखील मजीप्राकडून तयार करण्यात आला. अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन योजनांच्या कामांसाठी एकूण ३२ कोटी ६९ लाख ५५ हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचा प्रस्ताव मजीप्राकडून जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला.