चाकूचा धाक दाखवून सोन्याची चेन व मोबाइल लंपास

By Admin | Updated: August 27, 2015 00:54 IST2015-08-27T00:54:35+5:302015-08-27T00:54:35+5:30

आठवड्यातील तिसरी घटना.

Gold chain and mobile lamps with knife stitches | चाकूचा धाक दाखवून सोन्याची चेन व मोबाइल लंपास

चाकूचा धाक दाखवून सोन्याची चेन व मोबाइल लंपास

अकोला - रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीपक चौक परिसरातून मंगळवारी रात्री १ वाजेदरम्यान घरी जात असलेल्या एका इसमास चाकूचा धाक दाखवून अडवीत त्याच्या गळयातील सोन्याची चेन व मोबाइल चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ४ ते ५ दिवसांच्या कालावधीत अशा प्रकारची ही तिसरी घटना असल्याचे समोर आले आहे. मानेक टॉकीजच्या मागील रहिवासी राशीद ऊर्फ नेहाल अहमद निसार अहमद हा मंगळवारी रात्रीच्या दरम्यान दीपक चौकातून एम एच ३0 एके ८१११ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना त्याला लालबंगला परिसरातील रहिवासी आमीर खान व त्याचा साथीदार गुड्ड या दोघांनी चाकूचा धाक दाखवून अडविले. त्यानंतर १0 हजार रुपये किमतीचा मोबाइल, सुमारे ८0 हजार रुपये किमतीची ३0 ग्रॅम सोन्याची चेन घेऊन हे दोघेही फरार झाले. राशीदने या चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही त्याच्यावर चाकूने वार केल्याने त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी राशीदने रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आमीर खान व गुड्ड या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Gold chain and mobile lamps with knife stitches