गणेश विसर्जन सोमवारीच!

By Admin | Updated: September 4, 2014 01:24 IST2014-09-04T01:18:40+5:302014-09-04T01:24:55+5:30

अकोला येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणूक सोमवारीच काढण्यात येणार

Ganesh immersion on Monday! | गणेश विसर्जन सोमवारीच!

गणेश विसर्जन सोमवारीच!

अकोला : भाविकांचं लाडकं दैवत गणरायाचे आगमन होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला आहे. निम्मे दिवस झाल्यानंतर आता भाविकांना वेध लागले आहेत ते गणेश विर्सजनाचे. यंदा गणेश विसर्जन अनंत चतुदश्रीला ८ सप्टेंबरला आहे; परंतु या दिवशी पौर्णिमा येत असल्यामुळे गणेश विर्सजन करावे की करू नये, याबाब त भाविकांमध्ये संभ्रम होता; मात्र प्रशासनासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणूक सोमवारीच काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
गणेश विसर्जन दरवर्षी अनंत चतुदर्शलीचा केले जाते. यावर्षी अनंत चतुदश्रीच्या दिवशी ८ सप्टेंबरला सकाळी १0 वाजून ४८ मिनिटांनी प्रोष्ठपदी पौर्णिमा लागत असल्याने विसर्जन नेमके केव्हा करावे, सकाळी की दु पारनंतर याबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ८ सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमेला प्रारंभ होऊन ९ स प्टेंबरला सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होईल. त्यामुळे अनंत चतुर्दशी ७ सप्टेंबरला सकाळी १0 वाजून ४८ मिनिटांपर्यंतच असल्याने विसर्जनाबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजेच ९ सप्टेंबरला पितृपक्षास प्रारंभ होत असल्याने श्राद्धकाळात गणेश विसर्जन होऊ शकत नाही, असादेखील एक तर्क आहे. त्यामुळेच विसर्जनाला घेऊन भाविक संभ्रमित झाले होते. अकोला येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ८ सप्टेंबरलाच गणेश विसर्जनाचा निर्णय घेतला आहे. जोतिषाचार्यदेखील ८ सप्टेंबरच्या बाजूनेच असून, त्यांनी पौर्णिमेची विसर्जनाला बाधा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अकोला शहरातील गणेश विसर्जन ८ सप्टेंबरलाच होईल, हे निश्‍चित झाले आहे.

*अकोला शहरात गणेश विसर्जनासाठी आम्ही ८ सप्टेंबर ही तारीख निश्‍चित केली आहे. सर्व पदाधिकार्‍यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात बैठक घेऊन विसर्जनाच्या तयारीची रूपरेषा आखल्या जाणार आहेत. भाविकांनी कुठलाही संभ्रम न ठेवता गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावे.
- गुलाबराव गावंडे,
अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अकोला

*अनंत चतुर्दशी सोमवार, ८ सप्टेंबरलाच आहे. जरी या दिवशी दिवसभर पौर्णिमा असली तरी गणेश विसर्जनाला कुठलीही बाधा नाही. विसर्जनासाठी हा दिवस योग्य आहे. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत केव्हाही गणेश विसर्जन करण्याला हरकत नाही. शक्यतो सूर्यास्ताच्या आताच विसर्जन करावे.
- मोहनशास्त्री जलतारे,
जोतिषाचार्य

Web Title: Ganesh immersion on Monday!