शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत रंगला गजानन महाराजांचा पालखी सोहळा

By admin | Updated: September 9, 2014 21:26 IST

संत गजानन महाराजांच्या भक्तीचा महिमा सातासमुद्रापार.

राजेश शेगोकार / बुलडाणाविदर्भाचा पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या भक्तीचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून, अमेरिकेत महाराजांचा पहिला पालखी सोहळा भारतीय वेळेनुसार ७ सप्टेंबर रोजी अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.गजानन महाराज अमेरिका परिवाराच्यावतीने या पालखी सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेतील इर्वीन, कॅलिफोर्निया येथे आयोजित या सोहळय़ामध्ये अमेरिकेत स्थायिक असलेल्या महाराजांच्या १२५ भक्तांनी सहभाग घेतला. पालखी सोहळय़ास प्रारंभ करण्यापूर्वी गणपती अथर्वशीर्षसह पादुकांचे पूजन करण्यात आले. पालखीची परिक्रमा झाल्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भक्तीचा प्रसार व्हावा, हाच या परिवाराचा निर्मळ उद्देश असल्याने अमेरिकेतील हा पहिला पालखी सोहळा देशभरातील भक्तांसाठीही प्ररेणादायी असाच ठरला आहे.** अशी आहे पालखीअमेरिकेत निघालेल्या पहिल्या पालखी सोहळय़ासाठी वापरण्यात आलेली लाकडाची पालखी भारतातच तयार करण्यात आली आहे. या पालखीमध्ये गजानन विजय गं्रथ व पादुका ठेवण्यात आल्या. पालखी सोहळय़ात भगवी पताका, पालखीसोबतचा चांदीचा राजदंड व पालखीवर नक्षीदार छत्र आणि अंबरही होते. या परिक्रमेची अमेरिकेतील नागरिकांमध्येही उत्सुकता होती. **असा आहे अमेरिका परिवारगजानन महाराज अमेरिका परिवार या नावाने ओळखल्या जाणार्‍या या परिवाराची स्वतंत्र वेबसाईट आहे. दर महिन्याला गजानन महाराज नामजप सोहळा इंग्लंडमधील संदरलॅन्ड, अमेरिकेतील साऊथ फ्लोरिडा, लॉस एंजेलिस, सन फ्रान्सिस्को आदी ठिकाणी आयोजित केला जातो. प्रत्येक ठिकाणी किमान ४0 पेक्षा जास्त भक्त सहभागी होतात. यासोबतच वेबकॉन्फरन्सिंगमार्फत संपूर्ण जगभरातून महाराजांचे भक्त या परिवाराशी ह्यकनेक्टह्ण आहेत.