शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

गद्रे ऑटोकॉनमधील व्यवस्थापकाचा युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

By admin | Updated: July 31, 2014 02:08 IST

अकोला शहरातील घटना: बैठकीचे निमित्त करून युवतीला बोलाविले हॉटेलमध्ये.

अकोला: शिवणी येथील गद्रे ऑटोकॉन प्रा.लि. मधील व्यवस्थापकाने बैठकीचे निमित्त करून युवतीला हॉटेल ग्रीनलॅन्डमधील १0६ क्रमांकाच्या खोलीमध्ये बोलावून तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही बाब काही युवकांना माहीत पडल्याने, त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. युवकांनी व्यवस्थापकाची चांगलीच धुलाई करीत त्याला खदान पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना बुधवारी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. गंगानगर क्र. २ मध्ये राहणारा मोहम्मद जावेद हाजी हारूण (३८) हा शिवणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील गद्रे ऑटोकॉन प्रा. लि. येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. या ठिकाणी केशवनगर भागात राहणारी एक २0 वर्षीय युवतीसुद्धा काम करते. आरोपी तिला नेहमी त्रास देत असे, तिची छेड काढीत असे. तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी धमकी देत असे. बुधवारी सकाळी त्याने युवतीला फोन करून कंपनीची हॉटेल ग्रीनलॅन्डमध्ये बैठक असल्याचे सांगून तिला हॉटेलमध्ये बोलावून घेतले. युवती हॉटेलमध्ये आल्यावर त्याने तिला खोली क्र. १0६ मध्ये बोलाविले आणि तिला नोकरीवरून काढण्याची, समाजात बदनामी करण्याची धमकी देत, तिचा हात पकडला. तिला पलंगावर बसवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला; परंतु ही बाब काही युवकांना समजल्यावर त्यांनी हॉटेलवर धाव घेतली आणि मोहम्मद जावेद याला पकडून त्याची यथेच्छ धुलाई केली. खदान पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आरोपी मोहम्मद जावेद याच्यावर गुन्हा दाखल केला. *अँन्टी गुंडा स्क्वॉडमुळे टळला अनर्थ २५ ते ३0 युवकांच्या जमावाने आरोपी मोहम्मद जावेद याला पकडून त्याची धुलाई केली. घटनेची माहिती अँन्टी गुंडा स्क्वॉडचे महेंद्र बहादूरकर, विलास बंकावार, संतोष गवई यांना कळल्यावर त्यांनी हॉटेलवर धाव घेतली आणि जमावाच्या तावडीतून युवकाची सुटका करीत, त्याला खदान पोलिसांच्या ताब्यात दिले. अँन्टी गुंडा स्क्वॉड तेथे पोहोचले नसते तर जमावाने आरोपीला यमसदनी धाडण्याचा निश्‍चय केला होता.