शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

शिवकालीन योजनेची रोहयोमधून मुक्तता !

By admin | Updated: January 11, 2015 00:33 IST

आदेश प्राप्त ; बुलडाणा, जळगाव जिल्हा शिवकालीन योजनेतून वगळला.

बुलडाणा : बुलडाणा व जळगाव जिल्ह्यातील शिवकालीन योजनेची रोजगार हमी योजनेतून मुक्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले आहेत. या निर्देशामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.शिवकालीन पाणी साठवण योजनेची कामे रोजगार हमी योजनेमध्ये घेण्यात यावीत, असे निर्देश केंद्र सरकारने १ एप्रिल २0१४ रोजी दिले होते. रोहयोमध्ये काम करण्यास मजूर मिळत नसल्याने ही सर्व कामे ठप्प झाली होती. यासंदर्भात बुलडाणा जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी ७ जानेवारी रोजी आढावा बैठकीत लक्ष वेधले होते. त्याची तत्काळ दखल घेत खडसे यांनी विशेष बाब म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठपुरावा केला. ९ जानेवारी रोजी बुलडाणा व जळगाव जिल्ह्यातील शिवकालीन पाणी पुरवठा योजनांना वगळण्यात आल्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. साधारणपणे ६ ते १0 लाख रूपये खर्चाचा हा बंधारा त्या परिसरातील भूजल पातळी वाढविण्यासाठी मोलाचा ठरतो. जिल्ह्यात असे बंधारे बांधण्यासाठी जिल्हाधिकारी कुरूंदकर यांनी टंचाई काळात टँकरग्रस्त असलेल्या गावांचीच निवड केली, त्यामुळे गेल्या वर्षभरात ४२ गावांची टँकरमधून मुक्ती झाल्याने या योजनेची व्याप्ती यावर्षी अधिक वाढविण्याचे नियोजन प्रशासनाचे होते; मात्र या योजनेची कामे रोहयोमधूनच करण्याची अट केंद्र सरकारने घातलेली आहे. ९ जानेवारी रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर सचिव यांनी बुलडाणा व जळगाव जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन दोन्ही जिल्ह्यातील शिवकालीन योजना राहेयोच्या अटीमधून मुक्त केली आहेत. आता ही कामे पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा व स्वच्छता समिती मार्फत होतील. टँकरमुक्तीचे जलसंधारण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच शिवकालीन योजनेच्या कामाला आणखी गती देण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी स्पष्ट केले.