शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांचे वेतन थकले, शिक्षक संतप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 17:01 IST

शिक्षकांनी सातत्याने संस्थाचालकाकडे तगादा लावल्यानंतरही शिक्षण संस्थाचालकाने शिक्षकांना वेतन दिले नाही.

अकोला: जूना आरटीओ रोडवर असलेल्या एका खासगी कॉन्व्हेंटमधील ११ शिक्षक चार महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. शिक्षकांनी सातत्याने संस्थाचालकाकडे तगादा लावल्यानंतरही शिक्षण संस्थाचालकाने शिक्षकांना वेतन दिले नाही. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी शनिवारी संस्थाचालकास चांगलेच धारेवर धरले.तुकाराम चौकातील जूना आरटीओ रोडवर एक इंग्रजी माध्यमाची कॉन्व्हेंट आहे. या कॉन्व्हेंटमधील शिक्षकांना कोरोनाचे कारण दाखवून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. उद्योगधंदे, बंद आहेत. त्यामुळे अशातच खासगी शाळांसमोर सुद्धा आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. विदद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्काची रक्कम थकली आहे. त्यामुळे अनेक शाळांनी शिक्षकांना वेतन दिले नसल्याची बाब समोर आली आहे. या शाळेमधील ११ शिक्षकांना डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंतचे वेतन देण्यात आलेले नाही. कोरोनामुळे संचारबंदी लागू केली आहे. त्यात संस्थेने वेतन दिले नाही. त्यामुळे शाळांमधील शिक्षक, शिक्षिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चार महिन्यांपासून वेतन नाही. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा. असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे. शिक्षकांनी संस्थाचालकाकडे सातत्याने वेतनासाठी तगादा लावला. परंतु संस्थाचालकाने वेतन दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांना शनिवारी शाळेत धाव घेऊन संस्थाचालकास चांगलेच धारेवर धरले. अखेर काही दिवसांमध्ये वेतन देण्याचे आश्वासन संस्थाचालकाने दिले आहे. वेतनदिले नाहीतर शिक्षक कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार आहेत. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक