शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटींच्या अपहाराची माहितीच आली नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 14:12 IST

सर्वच गावांतील सरपंच, ग्रामसेवकांकडून ती रक्कम वसूल करावी, याबाबतच्या नोटीस पंचायत विभागाकडून सातत्याने दिल्या जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतला दिल्या जाणाऱ्या विविध योजनांंच्या निधीमध्ये ४ कोटी ३९ लाखांचा अपहार उघड झाल्यानंतर त्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी जबाबदार सरपंच, सचिवांच्या नावे जिल्हा परिषदेकडे सादर करावी, असे पत्र जिल्ह्यातील सातही गटविकास अधिकाऱ्यांना सप्टेंबरमध्येच देण्यात आले. ती माहिती अद्यापही सादर झालेली नाही. त्यामुळे रक्कम वसुली तसेच प्रशासकीय कारवाई रखडली आहे.ग्रामपंचायतींना विविध विकास कामे करण्यासाठी शासनाच्या योजनांचा निधी मिळतो. त्याशिवाय, वित्त आयोगाचा निधी, मुद्रांक शुल्क, गौण खनिज स्वामित्वधनाची रक्कमही मिळते. सोबतच विविध कराच्या रूपात वसुली केली जाते. अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्या रकमांच्या खर्चाचा हिशेब अद्ययावत नाही. लेखापरीक्षणाच्या काळात दस्तऐवजही उपलब्ध करून दिले जात नाहीत. त्यातच अनेक सरपंच, ग्रामसेवकांनी मनमानीपणे रक्कम काढून खर्च केल्याचे प्रकारही घडतात. गत काही वर्षांत घडलेल्या या सर्व बाबी नियमित लेखापरीक्षण अहवालात उघड झाल्या आहेत. त्यामध्ये वसूलपात्र रक्कम आणि जबाबदारीही निश्चित झाली आहे. सर्वच गावांतील सरपंच, ग्रामसेवकांकडून ती रक्कम वसूल करावी, याबाबतच्या नोटीस पंचायत विभागाकडून सातत्याने दिल्या जात आहेत. गटविकास अधिकाºयांकडून कारवाई होत नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडूनच कारवाईची तयारी करण्यात आली. त्यासाठी गटविकास अधिकाºयांनी संबंधित ग्रामपंचायतींच्या जबाबदार सरपंच, सचिवांची रकमेसह नावे द्यावी, असे पत्र गटविकास अधिकाºयांना देण्यात आले; मात्र माहितीच दिली नसल्याने कारवाई थंड बस्त्यात आहे.

५३७ ग्रामपंचायतींमध्ये अपहार लेखापरीक्षण अहवालात जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींमध्ये अपहाराची ६४९ प्रकरणे आहेत. त्यामध्ये सामान्य फंड, जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम रोजगार योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनांचा समावेश आहे. त्या प्रकरणात एकूण ४ कोटी ३९ लाख ८६ हजार २९८ रुपयांचा अपहार झाला आहे. सामान्य फंडातून अपहार झाल्याचे ३७४ प्रकरणे असून, त्यामध्ये ३ कोटी ११ लाख ५,७४३ रुपयांवर डल्ला मारला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत