शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांना पाणी मिळण्यासाठी बांधणार वनतळे

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

१७ वनविभागांमध्ये १९६ वनतळ्यांना मंजुरी

नीलेश शहाकार/बुलडाणा : दोन वर्षांपासून पडणार्‍या अल्प पावसामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत पूर्णत: आटले असून, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. त्याअनुषंगाने वन्यप्राण्यांना जंगलात पाण्याची सुविधा व्हावी, यासाठी महसूल व वनविभागाच्या योजनेअंतर्गंत १९६ वनतळे आणि बंधार्‍यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. राज्यातील १७ वन्यविभागांमध्ये येणार्‍या ५९ वनपरिक्षेत्रातील प्राण्यांना जंगलात सहज पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वनतळे, वनबंधारे, पाणी साठवणारे बंधारे बांधण्यात येणार असून, यासाठी ५८४.६९ लक्ष रुपयांचा निधी देण्याचा निर्णय वनविभागाने ७ जुलै रोजी घेतला. नुकताच संपलेला उन्हाळा व त्यानंतर पावसाने दडी मारल्याने जंगलातील नाले, छोटेमोठे पाणी साठवून राहणार्‍या पाणथळीच्या जागा कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांना तहान भागविण्याची कसरत करावी लागत आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले, तरी नव्याने बांधण्यात येणार्‍या वनतळे, वनबंधारे, तसेच सिमेंट बंधार्‍यांचा फायदा पुढच्या वर्षी वन्यजिवांना होणार आहे. *१७ वनविभागांचा समावेश औरंगाबाद वनवृत्तातील बीड, परळी, पाटोदा आणि धारुर, नागपुर वनवृत्तातील नागपूर, वर्धा आणि गोंदिया, धुळे वनवृत्तातील धुळे आणि जळगाव, यवतमाळ वनवृत्तातील यवतमाळ आणि पांढरकवडा, अमरावतीमधील पश्‍चिम मेळघाट, अमरावती आणि बुलडाणा, कोल्हापूर वनवृत्तातील सांगली, खानापूर आणि आटपाडी, तसेच गडचिरोली वनवृत्तातील आलापल्ली, घोट, मार्कंडा, चार्मोशी, पिरमिली, भामराड, एटापल्ली, कसनसूर, गट्ट, ताडगाव, सिरोंचा, असरअल्ली, गडचिरोली, उ.धानोरा, वडसा, देलनवाडी, कुरखेडा, पुराडा, बेडगाव, पोर्ला, आरमोरी आदी वनक्षेत्राचा या योजनेत समावेश आहे.