शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रक्चर आॅडिटमध्ये ‘जीएमसी’च्या पाच इमारती धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 12:17 IST

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ‘व्हीएनआयटी’ मार्फत इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले.

- प्रवीण खेतेअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील पाच इमारती धोकादायक स्थितीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ‘जीएमसी’तील ९२ वर्षे जुन्या इमारतीसोबतच इतर चार इमारतींचा समावेश असून, स्ट्रक्चर आॅडिट दरम्यान तपासणी करणाऱ्या चमूने याबाबत खुलासा केला आहे.पावसाळ््यात सर्वोपचार रुग्णालयातील ९२ वर्षे जुन्या इमारतीला गळती लागली होती. संभाव्य धोका पाहता ‘लोकमत’ने जुलै २०१९ मध्ये इमारतीच्या स्ट्रक्चर आॅडिटचा विषय लावून धरला होता. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून, रविवार, ३ नोव्हेंबर रोजी स्ट्रक्चर आॅडिटचा मुहूर्त काढण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ‘व्हीएनआयटी’ मार्फत इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले. यावेळी ‘व्हीएनआयटी’चे प्रा. इंगळे आणि प्रा. व्यवहारे यांनी इमारतीच्या पाहणीवेळी पाचही इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पाचही इमारती सर्वोपचार रुग्णालयाचा कणा असून, याच इमारतींमध्ये दररोज हजारो रुग्णांवर उपचार केला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाला स्ट्रक्चर आॅडिटचा अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झाला नसला, तरी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान व्हीएनआयटीच्या चमूने पाचही इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट केले होते.वर्षभरानंतर आली जागशासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गत वर्षभरापासून पत्रव्यवहार सुरू होते. इमारतीच्या स्ट्रक्चर आॅडिटसाठी जीएमसी प्रशासनातर्फे ४ ते ५ लाख रुपयांचा निधीही सार्वजनिक बांधकाम विभागाला वळता केला होता. अखेर वर्षभरानंतर सार्वजनिक बांधकाम विभागासह व्हीएनआयटीला जाग आली.इमारतींमध्ये महत्त्वाचे वॉर्ड व कार्यालयअतिदक्षता कक्षसर्जरी वॉर्डसोनोग्राफी, एक्स-रे कक्षसार्वजनिक वॉर्ड,प्रसूतीगृहब्लड बँकमहिला वॉर्डबाह्यरुग्ण विभागजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयसर्वोपचार रुग्णालयाची सर्वात जुनी इमारत १९२७ मध्ये बांधण्यात आली होती. त्यामुळे या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट आवश्यक होते. रविवार, ३ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत व्हीएनआयटीच्या पथकाने पाचही इमारतींचे स्ट्रक्चर आॅडिट केले असून, या इमारती धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले; परंतु अद्याप अधिकृत अहवाल आला नाही.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला.‘व्हीएनआयटी’च्या पथकाने ३ नोव्हेंबर रोजी जीएमसीच्या इमारतींचे स्ट्रक्चर आॅडिट केले. त्याच्या अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.- सुधीर ढिवरे, कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय