शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
3
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
4
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
5
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
6
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
7
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
8
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
9
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
10
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
11
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
12
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
13
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
14
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
15
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
16
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
17
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
18
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
19
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात मान्सून पहिल्यांदाच उशिरा

By admin | Updated: June 25, 2014 00:01 IST

सर्वांच्याच नजरा आभाळाकडे : पेरण्या खोळंबल्या

अमोल जायभाये/ खामगाव
मागील पाच वर्षात विदर्भात पेरण्या २२ जूनपूर्वी झाल्या आहेत; मात्र यावर्षी पहिल्यांदाच २४ जून उजाडला तरी सुद्धा पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे सर्वच चिंताग्रस्त आहेत. पावसाअभावी पेरणी रखडली आहे. वर्धा जिल्हा वगळता कुठेही पाऊस नाही. वर्धात झालेला पाऊसही मान्सूनपूर्व झाला आहे.
मागील पाच वर्षाची आकडेवारी पाहता २00९ साली विदर्भात अत्यंत कमी पाऊस पडला आहे; मात्र पेरणी २२ जूनला सुरु झाली होती. इतर वर्षी मान्सूनची कृपादृष्टी विदर्भावर चांगली आहे. २0११ मध्ये विदर्भात अतिशय चांगला पाऊस पडला होता. तर गत वर्षी पावसाने मागील ९९ वर्षाचे रेकॉर्ड तोडले होते.
यावर्षी २४ जून उलटला तरीही पाऊस येत नसल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. खत, बियाणे घरात आणून ठेवली आहेत. शेतीची पेरणीपूर्व कामेही झालेली आहेत. काही शेतकर्‍यांनी ठिबक सिंचनवर कपाशी लावलेली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून सक्रिय झाला आहे; मात्र अद्याप पाऊस पडला नाही.
२00९ मध्ये पाऊस कमी; परंतु पिकांसाठी पोषक पडला होता, त्यामुळे बळीराजा सुखी होता. मागील वर्षी पाऊस मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे ओला दुष्काळ पडला होता. दुसरे पीकही अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे गेले, त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. यावर्षी अद्याप पाऊस न पडल्यामुळे त्याची चिंता अजून वाढली आहे.
पाच वर्षाची आकडेवारी पाहिली तर २00९ मध्ये पाऊस कमी, २0१0 मध्ये समाधानकारक पाऊस पडला होता. तर २0११ मध्येही साधारण पावसाने सरासरी पूर्ण केली होती. २0१२ मध्ये पाऊस कमी झाला होता. तर मागील वर्षी खूप पाऊस झाला होता. त्यामुळे यावर्षी पाऊस कमी होणार असल्याचे अंदाज सगळ्य़ांनीच दिले आहेत.
प्रत्यक्षात मात्र मान्सून विदर्भावर कृपा करतो की अवकृपा, हे येणारे चार महिनेच सांगतील. सध्यातरी पेरणीलायक पाऊस पडला नसल्यामुळे पेरणी लांबत आहे. मान्सून सक्रिय झाल्याच्या बातम्या येत आहेत; मात्र तो कधी पडणार, याकडे आता शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.