शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

गाड्यांचे सुटे भाग विकणा-या दुकानाला आग

By admin | Updated: May 11, 2015 02:29 IST

अकोल्यातील गांधी रोड वरील दुकानाला आग; लाखोंची हानी, स्टुडिओही जळून खाक.

अकोला - गांधी रोडवरील अकोला नॅशनल गॅरेज गाड्यांचे सुटे भाग विकणार्‍या या दुकानाला व त्यावरील फिल्मको नामक स्टुडिओला रविवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांची हानी झाली असून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. गांधी रोडवर असलेल्या अकोला नॅशनल गॅरेज व फिल्मको स्टुडिओला रविवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीची माहिती तत्काळ मनपाच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाचे पाच बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळावर दाखल झाले; मात्र विद्युत पुरवठा खंडित होईपर्यंत आग न विझविण्याचा निर्णय अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घेतल्याने आग मोठय़ा प्रमाणात वाढली. एका तासानंतर विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल होऊन त्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या पाच बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले; मात्र तोपर्यंत या दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. अकोला नॅशनल गॅरेज सोबतच फिल्मको स्टुडिओतील साहित्यही जळाले असून, दोन्ही दुकानातील तब्बल १0 ते १२ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.