शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर छेडखानी प्रतिबंधक पथके कार्यान्वित

By admin | Updated: September 5, 2014 01:35 IST

अकोला शहरातील छेडखानी प्रतिबंधक पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

अकोला: शहरातील वाढत्या विनयभंग, छेडखानीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी स्वत: पुढाकार घेऊन शहरातील सातही पोलिस ठाण्यांतर्गत छेडखानी प्रतिबंधक पथके नियुक्त केली आहेत आणि या पथकांच्या कामास सुरुवातसुद्धा झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गाच्या परिसरामध्ये विनयभंग, छेडखानीच्या घटना सातत्याने घडत आहेत. यापूर्वी छेडखानीचे प्रकार रोखण्यासाठी तत्कालिन पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी छेडखानी प्रतिबंधक पथक सुरू केले होते. या पथकाच्या प्रमुख निलंबि त एपीआय नयना पोहेकर होत्या; परंतु एसीबीच्या जाळय़ात अडकल्याने त्यांचे हे पद गेले. त्यानंतर एपीआय शुभांगी दिवेकर यांच्याकडे पथकाची जबाबदारी देण्यात आली; परंतु त्या सुद्धा पथकाला न्याय देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे छेडखानी प्रतिबंधक पथक जवळपास संपुष्टातच आले होते. त्यामुळे शहरात छेडखानी, विनयभंगाच्या प्रकारांना ऊत आला. दररोज शहरातील अनेक भागांमध्ये महिला, तरुणींची टारगट युवकांकडून छेड काढली जाते. त्यांचा विनयभंग केला जातो. याबाबत लोकमत अनेकदा वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत, तत्कालिन पोलिस अधीक्षकांनी मोबाईल पेट्रोलिंग मोहीम सुरू केली. परंतु काही दिवसांमध्येच ही मोहीमसुद्धा थंड पडली. नव्यानेच रुजू झालेले पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पत्रपरिषदेत लोकमतने छेडखानी प्रतिबंधक पथकाचा मुद्दा उचलून धरला होता.

 ** पथकामध्ये राहतील तीन महिला कर्मचारीप्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या छेडखानी प्रतिबंधक पथकामध्ये एक अधिकारी व दोन महिला कर्मचार्‍यांचा समावेश राहणार आहे. परिस्थिती पाहून पथकामध्ये कर्मचार्‍यांची संख्या वाढविली जाईल.