शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
4
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
5
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
6
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
7
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
8
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
9
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
10
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
11
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
12
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
13
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
14
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
15
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
17
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
18
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
20
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर विहित नमुन्यात जात प्रमाणपत्रांचे वितरण सुरू

By admin | Updated: July 22, 2014 00:40 IST

विहित नमुन्यात जातीच्या प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले.

अकोला : उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी दिलेल्या निर्देशानंतर, अकोल्यातील सेतू केंद्रांमार्फत अखेर सोमवारपासून विहित नमुन्यात जातीच्या प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले. महसूल अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने दिल्या जाणार्‍या जातीच्या प्रमाणपत्रांसाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत जातीच्या प्रवर्गनिहाय विहित नमुना क्रमांक निश्‍चित करण्यात आले आहेत; परंतु अकोल्यातील काही सेतू केंद्रांकडून जातीचे प्रमाणपत्र विहित नमुन्यांऐवजी चुकीच्या व जुन्या नमुन्यात दिले जात आहेत. तसेच विहित नमुना क्रमांकाविनाच जातीचे प्रमाणपत्र दिले जात असून, विहित नमुना क्रमांक पाहून जातीचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी असलेल्या अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. या आशयाचे वृत्त रविवार, २0 जुलै रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे व तहसीलदार संतोष शिंदे यांनी सेतू केंद्रांमार्फत दिल्या जाणार्‍या जातीच्या प्रमाणपत्रांचे ह्यऑनलाईनह्ण नमुने काढून तपासणी केली. तसेच जातीच्या प्रवर्गनिहाय निश्‍चित करण्यात आलेल्या विहित नमुना क्रमांकासह आणि अद्ययावत नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश अकोला उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांमार्फत शहरातील सेतू केंद्रांना देण्यात आले. त्यानंतर सोमवार, २१ जुलैपासून सेतू केंद्रांमार्फत विहित नमुन्यात व विहित क्रमांकासह अद्ययावत स्वरूपातील जातीच्या प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले.