बळेगाव येथे अवधूत दाभाडे यांनी येथील चावडीवर अतिक्रमण केल्याचा वचपा काढण्यासाठी येथील सरपंच गोपाल वाघ व इतरांनी दाभाडे कुटुंबाला मारहाण केली. सरपंच व दाभाडे कुटुंबाचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. दाभाडे कुटुंबाने सरपंचाविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात अपात्र होण्यासाठी केस दाखल केली. सरपंचांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी तक्रारसुद्धा केली आहे. या वादातून सरपंच वाघ व इतर आराेपींनी दाभाडे कुटुंबाच्या घरी जाऊन मारहाण केली. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी गणेश सोळंके, अमोल डाबेराव, शुभम डाबेराव, उषाबाई डाबेराव, सरपंच गोपाल प्रकाश वाघ, अजय रहाटे यांच्यासह सहा ते सात लोकांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच श्याम दाभाडे, गणेश दाभाडे, कृष्ण दाभाडे, योगेश दाभाडे, किरण गायकवाड, भारत दाभाडे यांच्याविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल केला.
बळेगाव येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:24 IST