शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे बाप, तापच ताप!

By admin | Updated: July 28, 2014 01:55 IST

अकोला जिल्ह्यातील खासगीसह शासकीय रुग्णालये हाऊसफुल; आरोग्य विभागाकडून उपाययोजना नाहीत.

सचिन राऊत / अकोलाढगाळ वातावरण, लगेच रिमझिम पाऊस एक दिवस उलटत नाही तोच पुन्हा कडाक्याचं उन्हं. या वातावरणातील चढ-उतारामुळे जिल्हय़ात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगीसह शासकीय रुग्णालये हाउसफुल्ल झाली असली तरी आरोग्य विभागाच्या लेखी मात्र अद्याप जिल्हय़ात सर्व काही ठिक आहे. पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे. झडीचे वातावरण आणि लगेच कडाक्याचं उन्हं, अशा विरोधाभासी वातावरणामुळे जलजन्य व कीटकजन्य आजारासोबतच कावीळ आणि चेहर्‍यावर ह्यमसह्णची साथ असल्याची माहिती शहरासह जिल्हय़ातील डॉक्टर व शासकीय रुग्णालयांमधून घेतलेल्या माहितीमधून समोर आली आहे. अकोला शहरासह जिल्हय़ात कावीळ व अज्ञात तापाचीही साथ आहे. लहान मुले व वृद्धांसह अनेकांना कावीळ आजार तसेच अज्ञात तापाने त्रस्त केले आहे. या वातारवणामुळे दम्याच्या रुग्णांचा त्रास वाढला असून, श्‍वसन व घशाच्या आजारांसोबतच डेंग्यू, सर्दी, ताप, डोकेदुखी, मलेरिया व डायरियाच्या रुग्णांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. घशात खवखव होणार्‍या रुग्णांचा त्रास या वातावरणातील बदलामुळे वाढला असून, घशातील खवखव जास्त दिवस राहिल्यास इतर गंभीर आजार होण्याचा धोका संभत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. डोळय़ांची जळजळ होत असल्यास या आजारांकडेही दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच उपचार करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करून प्यावे, बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचा उपयोग करावा. या काळात डासांची उत्पत्ती प्रचंड होत असल्याने मुलांचे डासांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. तेलकट अन्नपदार्थ पावसाच्या दिवसांमध्ये खाऊ नयेत, असे अहवान जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे. *सवरेपचारमध्ये रुग्णांची गर्दीसवरेपचार रुग्णालयामध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण असून, या ठिकाणी ७00 च्यावर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये डायरिया, मलेरिया, मळमळ होणे यासारखे आजार असलेले रुग्ण अधिक आहेत. यासोबतच मेंदूचा हिवताप, डेंगी ताप व अशक्तपणा आल्यामुळे तब्बल ४२४ रुग्ण सवरेपचारमध्ये दाखल झाले आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यात येत असले तरी सवरेपचारमध्ये येणार्‍या रुग्णांची संख्या वाढतच आहे.