शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी करणार ‘सात-बारा’ची पडताळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 14:09 IST

चावडी वाचन विशेष मोहिमेत नोंदविता येणार आक्षेप

चावडी वाचन विशेष मोहिमेत नोंदविता येणार आक्षेपअकोला : महसूल विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या ई-फेरफार व ई-चावडी वाचन कार्यक्रमांतर्गत ह्यचावडी वाचनह्णची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ह्यसात-बाराह्णमधील चुका व त्रुटीची पडताळणी शेतकरी करणार असून, सात-बारातील चुकांसंबंधी शेतकर्‍यांचे आक्षेप नोंदविण्यात येणार आहेत.शेतकर्‍यांचा सात-बारा अद्ययावत करण्यासाठी महसूल विभागामार्फत राज्यात ई-फेरफार व ई-चावडी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये १ मे ते १५ जुलै या कालावधीत तीन टप्प्यात राबविण्यात येणार्‍या विशेष मोहिमेत १ ते १५ मे या कालावधीत महा-ई-सेवा केंद्र तसेच सेतू केंद्रांवर जाऊन शेतकरी ऑनलाइन सात-बारा पाहू शकतील आणि सात-बारासंबंधी काही आक्षेप असल्यास त्याबाबत संबंधित तहसीलदार व तलाठय़ांकडे लेखी पत्राद्वारे आक्षेप नोंदविता येणार आहेत. तसेच १६ मे ते १५ जून या कालावधीत चावडी वाचन मोहिमेत ह्यसात-बाराह्णची तपासणी, चुकांची दुरुस्ती व आक्षेप स्वीकारण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. गाव पातळीवर चावडी वाचन कार्यक्रमात, संबंधित शेतकरी ह्यसात-बाराह्णमधील चुका व त्रुटीची पडताळणी करू शकतील आणि त्यासंबंधी आक्षेप असल्यास संबंधित तलाठी व तहसीलदारांकडे नोंदवू शकतील. १६ जून ते १५ जुलै या कालावधीत चावडी वाचन कार्यक्रमात प्राप्त तक्रारीनुसार सात-बारामध्ये प्रत्यक्ष दुरुस्ती करण्यात येणार असून, आक्षेपांचा निपटारा करण्यात येणार आहे. तक्रारी आणि आक्षेपांचा निपटारा करून, शेतकर्‍यांचा संगणकीकृत सात-बारा अद्ययावत करण्याच्या या मोहिमेनंतर, राज्यात शेतकर्‍यांना ऑनलाइन पद्धतीने सक्षम अधिकार्‍यांच्या डिजिटल स्वाक्षरीसह सात-बारा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.शासनाच्या निर्देशानुसार सात-बारा अद्ययावत करण्यासाठी ई-फेरफार व ई-चावडी वाचन कार्यक्रमांतर्गत १ मे ते १५ जुलै या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत संगणकीकृत सात-बारा शेतकर्‍यांनी पाहून पडताळणी करावी आणि चुका व त्रुटीसंबंधी संबंधित तलाठी व तहसीलदारांकडे आक्षेप नोंदविणे गरजेचे आहे. आक्षेपानुसार सात-बारामध्ये दुरुस्ती करून सात-बारा अद्ययावत करण्यात येणार आहे.-प्रमोद देशमुख उपजिल्हाधिकारी (महसूल), अकोला.