शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’

By admin | Updated: May 4, 2015 01:21 IST

अकोला येथे शंकरबाबा पापळकर यांच्या सोळाव्या मानसकन्येचा विवाह सोहळा.

विवेक चांदूरकर/ अकोला: केंद्र व राज्यातील मंत्री, आजी-माजी आमदार, सर्वपक्षीय नेते, बहुतांश खात्याचे अधिकारी, विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले समाजसुधारक व हजारो वर्‍हाडींच्या उपस्थितीत शंकरबाबा पापळकर यांच्या सोळाव्या मानसकन्येचा विवाह सोहळा मोठय़ा थाटात रविवारी सायंकाळी मराठा मंडळ कार्यालयात पार पडला. हा सोहळा नयनरम्य होता, उपदेशात्मक होता, ऊर्जात्मक होता. जीवनाला दिशा व जगण्याला उद्देश देणारा ठरला. स्व. अंबादास पंत वैद्य अपंग बालगृह वझ्झर ता. अचलपूर या संस्थेचे सचिव शंकरबाबा पापळकर यांची सोळावी मानसकन्या कांती हिचा विवाह सोहळा बाळापूर येथील मोतीलाल डोळसकर यांचा मुलगा धनंजय यांच्याशी रविवारी सायंकाळी पार पडला. ३ मे रोजी अकोल्यात ४३ डिग्री तापमान होते. मात्र, या तापमानातही लोकांना ओढ होती ती मराठा मंडळ कार्यालयात पार पडणार्‍या विवाह सोहळ्याची. सायंकाळ होताच लोकांची गर्दी जमत होती. मराठा मंडळ मंगल कार्यालय लोकांनी फुलत होते. शंकरबाबा पापळकर स्वत: बॅन्डच्या आवाजात येणार्‍या पाहुण्यांचे स्वागत करीत होते. त्यांना मंगल कार्यालयाच्या आतमध्ये सोडत होते. या सोहळ्याला केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, विभागीय उपायुक्त रवींद्र ठाकरे, आ. रणधीर सावरकर, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शंकरबाबा पापळकर यांच्यापासून आम्हाला समाजकार्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन हंसराज अहीर यांनी यावेळी केले.