शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख शेतक-यांना पीक विम्याची अपेक्षा !

By admin | Updated: November 24, 2014 00:41 IST

पश्‍चिम व-हाड : सरासरी ४२.५0 पैसे आणेवारी.

ब्रह्मनंद जाधव मेहकर (बुलडाणा)

          पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप हंगाम पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍यांच्या हातून निघून गेला. पश्‍चिम वर्‍हाडाची पीक आणेवारी ४२.५0 पैसे निघाली असून आणेवारीने शेतकर्‍यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. सुमारे ३ लाख शेतकर्‍यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेचा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम जिलत पावसाने सुरूवातीपासून दडी मारल्यामुळे खरीप हंगामात शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. रब्बी हंगामाची स्थितीही चांगली नाही. पावसाअभावी या भागावर दुष्काळाचे संकट ओढवले असून, महसूल विभागाच्या आणेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुधारित आणेवारीमुळे शेतकर्‍यांना दुष्काळसदृश स्थितीतील निकषांनुसार लाभ मिळणार आहे. त्यात शेतसारा-करमाफी, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३ टक्के सवलत आदी सवलती दिल्या जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. ३ लाख ६ हजार ६८१ शेतकर्‍यांनी २ लाख ८0 हजार ३२४ हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा काढला आहे. त्यासाठी सुमारे १0 कोटी २६ लाख ७७ हजार रुपयांचा पीक विम्याचा हप्ता शेतकर्‍यांनी भरला आहे. अकोला जिलची पीक आणेवारी ४१ पैसे असून, या जिलतील ६७ हजार १४ शेतकर्‍यांनी ७६ हजार ८0२ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. त्याचा २ कोटी ८७ लाख ३४ हजार रुपये हप्ता शेतकर्‍यांनी भरला. बुलडाणा जिलची पीक आणेवारी ४२ पैसे असून, १ लाख ७५ हजार ४१६ शेतकर्‍यांनी १ लाख २९ हजार ७0 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला. त्यासाठी ५ कोटी १५ लाख ३३ हजार रुपये हप्ता भरला. वाशिम जिलची पीक आणेवारी ४४.५0 पैसे निघाली असून, ६४ हजार २५१ शेतकर्‍यांनी ७४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला. त्यासाठी २ कोटी २४ लाख १0 हजार रुपये विम्याचा हप्ता भरण्यात आला.