शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरात उत्साह रामनवमीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 13:09 IST

अकोला: उत्तर भारतातील श्रीराम जन्मभूमी ते दक्षिणेतील रामेश्वरमपर्यंत श्रीरामनवमीला रामजन्म सोहळा उत्साहात साजरा केला जातो.

-  नीलिमा शिंगणे-जगडअकोला: उत्तर भारतातील श्रीराम जन्मभूमी ते दक्षिणेतील रामेश्वरमपर्यंत श्रीरामनवमीला रामजन्म सोहळा उत्साहात साजरा केला जातो. शहरात मोठे राममंदिर, छोटे राममंदिर, बिर्ला राममंदिरात चैत्राच्या आगमनापासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असल्याने भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.  शनिवारी चैत्र शुद्ध नवमीला साजरा होत असलेल्या रामजन्म सोहळ्यासाठी रामभक्तांची पूर्वतयारी पूर्णत्वास आली आहे.चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील नवव्या दिवसाला रामनवमी म्हणतात. वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यातील हा सर्वात मोठा उत्सव. दुष्ट शक्तींना ज्यावेळी भूतलावरील सज्जनांना त्राही करू न सोडले, तेव्हा दुष्ट शक्तींच्या निर्दालनासाठी श्रीविष्णूने भूतलावर अवतार घ्यावयाचे मान्य केले होते. हा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र होय, असे रामायण ग्रंथात सांगितले आहे.सामाजिक व सांस्कृतिक महत्त्वरामकथा परंपरेने भारताच्या जवळपास सर्वच भाषांमध्ये आहेत. रामनवमीच्या निमित्ताने या रामकथांचे पठण केले जाते. भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केल्या जातात. ‘काळाराम मंदिर’ सत्याग्रहामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातही रामनवमीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात संगीतकार सुधीर फडके आणि गीतकार ग़. दि. माडगुळकर यांच्या गीत रामायणामुळे रामायणातील प्रत्येक प्रसंग घराघरांत मुखोद्गत झालेला आहे. गीत रामायणातील आलंकारिक शब्दांनी मराठी मनामध्ये रामायणाचे आणि रामनवमीचे महत्त्व बिंबविले आहे. बाबूजी आणि गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यावर्षी संस्कार भारतीने अवघ्या महाराष्ट्रात गीत रामायणाचे कार्यक्रम सादर करीत आहेत.

शहर झाले राममय!शहरामध्ये श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने श्रीराजराजेश्वर मंदिर ते मोठे राममंदिर, सिटी कोतवाली चौक आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगविला आहे. हैदराबादच्या कलावंतांनी तयार केलेल्या देवी-देवतांची चित्र असलेली विद्युत रोषणाई अकोलेकरांचे लक्ष वेधत आहे. महाराणा प्रताप बागजवळ अहिरावण आणि रामयुद्ध प्रसंग, जुने शहरात रेणुका माता व दत्त जन्माचा देखावा तयार करण्यात आला आहे. रामनवमी उत्सव समितीच्यावतीने गांधी रोडवर भगव्या ध्वजांचे तोरण लावून संपूर्ण मार्ग सजविला आहे. राम दरबार देखावा उभारण्यात आला. गंगाआरतीच्या धर्तीवर महाआरती, गुढीपाडवा ते रामनवमी याकालावधीत जन्मणारे बाळांना पाळण्याचे वाटप आदी सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम समितीच्यावतीने करण्यात आली. गांधी रोडवरील छोट्या राम मंदिरातदेखील भजन व कीर्तन कार्यक्रम घेण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाRam Navamiराम नवमी