शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात ऊर्जा संवर्धन तंत्रज्ञान पथदर्शक प्रकल्प

By admin | Updated: November 12, 2014 00:15 IST

तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम : विजेची बचत होणार.

गिरीष राऊत / खामगावकाळाची गरज ठरलेले विजेच्या बचतीचे महत्त्व आता शासनाच्याही लक्षात येत असून, या उद्देशाने येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ऊर्जा बचतीस मदत करणारी उपकरणे बसविल्या जात आहेत. त्यासाठी २५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या उपकरणांमुळे दर महिन्याच्या वीज देयकात सुमारे ३0 टक्के बचत होणार असून, त्यामुळे महिन्याकाठी ३0 हजार रुपये याप्रमाणे वर्षभरात सुमारे ३.५ लाख रुपयांची बचत होणार आहे आणि पाच वर्षांच्या आतच अनुदानाची रक्कम पूर्णपणे वसूल होणार आहे.शासकीय कार्यालयांमध्ये होणार्‍या वीज वापरात बचत व्हावी यासाठी शासनाने महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धन तंत्रज्ञान पथदश्री प्रकल्प राबविल्या जात आहे. या ऊर्जा संवर्धन तंत्रज्ञान पथदश्री प्रकल्पासाठी येथील शासकीय तंत्र निकेतनची निवड करण्यात आली असून, २५ लाख ३२ हजार ४५५ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहेत. सदर अनुदान संस्थेला प्राप्त झाले असून, या अनुदानातून तंत्रनिकेतन, तसेच मुलांच्या व मुलींच्या वसतिगृह व आवारात ऊर्जा बचत करणारे दिवे, पंखे, सोलर वॉटर हिटर प्रणाली लावण्यात येत आहेत. त्यासाठी ६0 वॉटचे २५ एलईडी दिवे, २५0 ऊर्जा बचत करणारे पंखे, ऊर्जेची बचत करणारे इलेक्ट्रॉनिक चोकयुक्त २५८ ट्युब लाईट, आदी वीज उपकरणे प्राप्त झाली आहेत. त्यापैकी अध्र्याहून जास्त उपकरणे लावण्यात आली आहेत, तर उर्वरित उपकरणे लावण्याचे काम सुरू आहे. वसतिगृहांमध्ये आतापर्यंत स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरचा वापर करून पाणी गरम करण्यात येत होते; मात्र या प्रकल्पांतर्गत सौर ऊज्रेवर चालणारी सोलर वॉटर हिटर प्रणाली प्राप्त झाली असून, ती मुलींच्या वसतिगृहामध्ये लावण्यात आली आहे. त्यामुळे सिलिंडरची बचत होणार आहे. *महिन्याकाठी होईल ३0 हजाराची बचत!सध्याच्या घडीला शासकीय तंत्रनिकेतनचे मासिक वीज देयक सरासरी एक लाख रुपयांच्या घरात असते; मात्र ऊर्जा बचत करणारी उपकरणे लावल्यामुळे वीज वापरात ३0 टक्के बचत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मासिक देयक ३0 हजार रुपयांनी कमी होण्याची आशा आहे. त्यामुळे या प्रकल्पावरील २५ लाख रुपयांचा खर्च पाच वर्षांच्या आतच वसूल होऊ शकतो.