शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात वीजबिल भरणा केंद्रे सुरु; मिटर रिडींग, बील वितरणास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:11 IST

जिल्हयात महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरू करून ग्राहकांची वीजबिल भरण्याची अडचण दुर करण्यात आली आहे.

अकोला : जिल्हयात महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरू करून ग्राहकांची वीजबिल भरण्याची अडचण दुर करण्यात आली आहे. तसेच यापुढे जिल्हयातील कंन्टेनमेंट क्षेत्र वगळता इतर वीज ग्राहकांना वीज वापराचे अचूक वीज बिल देण्यासाठी ग्राहकांचे मीटर वाचन करण्याबरोबरच वीज बिलाचे प्रीटींग करून ते वितरीतही करण्याचे निर्देश अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिले आहे.कोरोनाच्या पृष्ठभूमीवर विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वीज बिल भरणा केंद्रे बंद करण्यात आले. होते. यासोबतच ग्राहकांचे मीटर वाचन , वीज बिलाचे प्रीटींग आणि वितरणही बंद करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारच्या वेळोवेळी प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार महावितरण मुख्य प्रशासनाने आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या निदेर्शाच्या अधिन राहून फिजिकल डिस्टंन्सिंग नियमाचे काटेकोर पालन करत, अकोला जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आपल्या वीज वापराचे अचूक वीज बिल देण्यासाठी मीटर वाचन,बिल प्रीटींग आणि वीज बिलाचे वितरण करण्याबरोबरच वीज बिल भरणा केंद्रावर वीज बिल स्विकृतीची परवानगी देण्यात आली असल्याने यापुढे वीज ग्राहक महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रावर आपले वीज बिल भरू शकतात.प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध कायमपण सुरक्षेच्या दृष्टीने शासनाचे पुढील आदेश येयीपर्यंत जिल्ह्यातील कन्टेनमेंट झोन मधील ग्राहकांचे मीटर वाचन करण्यात येणार नाही. तसेच त्यांना वीज बिल वितरीत करण्यात येणार आहे.त्यामुळे या झोन मधील वीज ग्राहकांना अचूक वीज मिळण्यासाठी महावितरणचे मोबाईल एप डाऊनलोड करून स्वत: आपल्या वीज मिटरची रिडींग पाठविणे गरजेचे आहे. तसेच या भागातील वीज बिल भरणा केंद्रेही बंद राहणार आहेत.ंमिटर रिडींग करणाऱ्यांना नियमांचे पालन बंधनकारककोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याची काळजी घेत मीटर वाचन एजन्सिंच्या सभासदांना महावितरणच्या वतिने ओळख पत्र देण्यात येणार आहेत, याशिवाय त्यांना हँड ग्लोज,चेहऱ्यावर मास्क बांधने,सोबत सॅनिटाईजर ठेवणे यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य सेतू एप डाऊनलोड करून त्यात माहिती भरण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय हरकत असलेल्या ग्राहकांचे मीटर वाचन करण्यात येणार नाही. असे असले तरी ग्राहकांनीही सोशल डिस्टंन्सिंग पाळत सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मीटर रिडरचे ओळखपत्र तपासूणच मीटर वाचनाची परवानगी द्यावी असे आवाहन महावितरण अकोल जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण