शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात दीड तासात ३७.३ मि.मी.पाऊस!

By admin | Updated: July 11, 2014 00:45 IST

गुरूवारी सायंकाळी अखेर पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात पातूर आणि बाश्रीटाकळी तालुक्यासह अकोला तालुक्यातील काही भागात पाऊस पडला.

अकोला- प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गुरूवारी सायंकाळी अखेर पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात पातूर आणि बाश्रीटाकळी तालुक्यासह अकोला तालुक्यातील काही भागात पाऊस पडला. शहरात दीड तासात ३७. ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गुरुवारी अकोल्यात दमदार पाऊस बरसला. सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. हलक्या सरीने सुरुवात झाल्यानंतर पावसाची दमदार हजेरी अकोलेकरांना सुखावून गेली. सहा वाजेपर्यंत शहरातील रस्ते जलमय झाले होते. अकोला तालुक्यात कुरणखेडपासून पुढे पाऊस होता. बाश्रीटाकळी आणि पातूर तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला. सरीरात्री ८.३0 वाजेपर्यंत अकोला शहरात ३७.३ मि.मी.पावसाची नोंद हवामान खात्याने केली.

** स्थानिक प्रभावाने पाऊस

सार्वत्रिक पावसासाठी आणखी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे अकोला शहर व परिसरात पडलेला पाऊस हा वातावरणातील स्थानिक घडामोडींचा परिणाम असल्याची माहिती नागपूर येथील वेधशाळेने दिली. पाऊस प्रणाली अद्याप विकसित झाली नसली तरी त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसात सार्वत्रिक पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

** विद्युत पुरवठा खंडित

गुरुवारी सायंकाळी पाऊस आल्यामुळे अध्र्या शहरातील विद्युत पुरवठा दोन ते तीन तासांकरिता बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. गुरुवारी सायंकाळी शहरात एक तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील विद्युत व्यवस्थेची पूर्ण तारांबळ उडाली. तारा तुटल्याने तसेच रोहित्र बिघडल्याने अध्र्या शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गोरक्षण रोड, गिरी नगर, जुने शहर, खदान परिसरातील विद्युत पुरवठा बंद होता. गिरीनगरमधील विद्युत पुरवठा रात्री दहा वाजेपर्यंत बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.