शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

येत्या महिन्यात वाढणार हवेतील धुळीचे प्रमाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 15:02 IST

दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात हवेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत असल्याचे निरीक्षणही त्यामध्ये नोंदविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील १८ शहरांमध्ये होत असलेल्या हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिकांनी तयार केलेल्या कृती आराखड्यात विविध मुद्यांवर बोट ठेवण्यात आले. त्यामध्ये शहरांतील रस्त्यांवर असलेले अतिक्रमण, त्यातच रस्त्याच्या बाजूला पादचारी मार्गांचा अभाव असणे, या बाबींवरही उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले आहे. दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात हवेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत असल्याचे निरीक्षणही त्यामध्ये नोंदविण्यात आले आहे.पर्यावरणातील घटकांच्या प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यातील हवेचे प्रदूषण घातक पातळीच्या वर जात असल्याचे अहवाल राज्यातील अनेक शहरांतून आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित महापालिकांच्या सहकार्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यातील उपाययोजना राबविण्यासाठी संबंधित महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी आहे. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यात प्रदूषणाची कारणे नमूद केली आहेत. त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी मंडळ व महापालिकांची आहे. अकोला शहरातील प्रदूषणाला रस्त्याच्या कडेलगत असलेली धूळ, वाहनांमध्ये इंधन ज्वलनातून निघणारा धूर, या दोन प्रमुख बाबींमुळे हवेचे प्रदूषण धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचते. विशेषत: डिसेंबर, जानेवारी महिन्यात त्यामध्ये प्रचंड वाढ होते.अकोल्याची हवा प्रदूषणाची कारणे

  • रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनांतील इंधनाचे ज्वलन वाढते.
  • रस्त्यावरची धूळ तसेच इतर कारणांमुळे वातावरणात मिसळणारे घटक.
  • निर्माणाधीन बांधकामे, जुन्या इमारती पाडणे.
  • उपाहारगृहे, खानावळींमध्ये लाकूड, कोळशाच्या भट्ट्या लावणे.
  • आॅटोरिक्षामध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये रॉकेलचा वापर. त्यातून हवेत विषारी घटक मिसळतात.
  • रस्त्यालगतची धूळ. भूयारी गटार योजनेचा अभाव. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षांचा अभाव.
  • रस्त्यांची खराब अवस्था, सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव. नायगाव येथे कचरा पेटवून देणे. कचरा डम्प करणे.
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसणे. त्यामुळे वैयक्तिक वापराच्या वाहनांमध्ये वाढ.
  • शहरालगत नियमबाह्यपणे झालेला वस्त्यांचा विस्तार.
  • मनपा हद्दीत वीज निर्मितीसाठी डीझल पंप वापराचे कोणतेही नियम नसणे. घरगुती स्वयंपाकासाठी धूर निर्माण करणाºया घटकांचा वापर.
टॅग्स :Akolaअकोलाair pollutionवायू प्रदूषण