शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली राजराजेश्‍वर नगरी

By admin | Updated: July 10, 2014 01:27 IST

अकोल्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

अकोला : दरवर्षी येणार्‍या आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं महत्त्व न्यारंच. आषाढी एकादशीची चाहुल लागताच विठ्ठल भक्ताच्या मनात आनंद तरंग वाहू लागतात. ह्ययाची डोळा याची देहीह्ण कधी एकदा पंढरीच्या रायाचं दर्शन घेतो, अशी अवस्था भक्तांची होऊन जाते. बुधवारी राजराजेश्‍वर नगरीतील विविध भागात असलेल्या विठ्ठल मंदिरांमध्ये मोठय़ा उत्साहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. ३00 वर्ष पुरातन असलेल्या जुने शहरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे ४ वाजता आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. महा पूजेनंतर आरती झाली. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या गर्दीमुळे दिवसभर मंदिराचा परिसर फुलून गेला होता. परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पूजासाहित्य, खेळणी आणि गृहोपयोगी साहित्यांची दुकाने परिसरात व्यावसायिकांनी थाटली होती. फराळी खाद्यपदार्थांचेदेखील स्टॉल परिसरात लावण्यात आले होते. आषाढीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे दिवसभर मंदिरात भाविकांची गर्दी होती. रात्री ९.३0 ते ११.३0 च्या दरम्यान डॉ. अभय कुळकर्णी यांचे कीर्तन पार पडले. कीर्तनाप्रसंगी अनुजा देश पांडे हिने तबल्यावर साथ दिली.