ट्रकसह चालकाचा कोळसा

By Admin | Updated: September 8, 2014 01:11 IST2014-09-08T00:48:41+5:302014-09-08T01:11:37+5:30

अकोला महामार्गावरील पैलपाडानजीकची घटना

Driver's Coal With Truck | ट्रकसह चालकाचा कोळसा

ट्रकसह चालकाचा कोळसा

बोरगाव मंजू : अकोल्याहून नागपूरकडे जात असलेला एक भरधाव ट्रक उलटल्यानंतर त्याने पेट घेतला. यात चालक व ट्रकमधील माल जळून खाक झाल्याची घटना रविवार, ७ सप्टेंबर रोजी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर पैलपाडा गावानजीक घडली. राजेश तुलाराम परतेची (३५, रा. नागपूर) असे मृतक चालकाचे नाव आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथील बीटीएस ट्रान्सपोर्टचे मालक भूपिंदरसिंग मंजितसिंग माखन यांचा सी.जी. 0४ एच.सी. ७२७९ क्रमांकाचा ट्रक सुरत येथून नागपूरकडे साड्या व कापड, असा माल घेऊन जात होता. यावेळी महामार्गावरील पैलपाडानजीक पहाटे पाच वाजताचे सुमारास हा ट्रक उलटला. रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्यानंतर या ट्रकने अचानक पेट घेतला. आगीच्या तीव्र ज्वाळांनी वेढल्यामुळे चालक राजेश परतेची याला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. ट्रकच्या कॅबीनमध्येच त्याचा कोळसा झाला. अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार आव्हाळे यांनी त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी अकोला व मूर्तिजापूर येथील अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी ही आग आटोक्यात आणली; परंतु तोपर्यंंत ट्रकमधील माल व चालक जळून खाक झाले. पोलिसांनी चालकाचा जळालेला मृतदेह बाहेर काढला असून, तो उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. वृत्त लिहिस्तोवर मृतक चालकाची ओळख पटविणे शक्य झाले नव्हते.

Web Title: Driver's Coal With Truck