शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे दरवाजे उघडले

By admin | Updated: September 8, 2014 00:04 IST

तेल्हारा तालुक्यातील वान तर अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणाचे दरवाजे अंशत: उघडले अतवृष्टीचा इशारा

तेल्हारा/अकोट/पातूर : गत आठवडाभरापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्हय़ातील जलाशयांची पातळी वाढत असून, तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या वान प्रकल्पाचे सहा, तर पोपटखेड धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. येत्या २४ तासांत अतवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.गत महिन्यात प्रदीर्घ विश्रांती घेतल्यानंतर वरुणराजाने या महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्हय़ात जोरदार हजेरी लावली आहे. गत आठवडाभरापासून जिल्हय़ात सर्वत्र दमदार पाऊस बरसत आहे. जिल्हय़ात अनेक ठिकाणी शनिवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे जलाशयांची पातळी वाढली असून, तेल्हारा तालुक्यातील वान धरणाची पातळी शनिवारी ९0.९८ टक्के भरल्याने शनिवारी रात्री धरणाचे दोन दरवाजे १0 सेंटीमीटर उघडण्यात आले. रविवारीही दिवसभर पाऊस सुरूच होता. त्यामुळे दुपारी या धरणाची पातळी ९२ टक्क्यांवर गेल्याने आधी चार व रात्री सर्व सहा दरवाजे ३0 सेंटीमीटरने उघडण्यात आले. नदीपात्रात विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावंना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आकोट तालुक्यातील पोपटखेड धरण ९0.६६ टक्के भरल्याने या प्रकल्पाचे दोन दरवाजे एक सेंटीमीटरने उघडण्यात आले.

** पातूर तलाव ओव्हर फ्लोपातूर : गत आठवडाभरापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे बोर्डी नदीवरील पातूरच्या घाटाजवळचा तलाव १00 टक्के भरला असून, रविवारी तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास प्रारंभ झाला.रविवारी दुपारी १२ वाजतापासून पातुरात दमदार पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर पाऊस सुरूच होता. तालुक्यातही बहुतांश ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नदी-नाले भरून वाहू लागले. दरम्यान, तालुक्यातील निगरुणा धरण ८३ टक्क भरले असून, मोर्णा धरण ४५ टक्के भरले आहे. इतरही लहान-मोठय़ा जलाशयांची पातळी वाढली आहे. पातूर तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने हे नयनरम्य दृष्य पाहण्यासाठी हौशी पर्यटकांची गर्दी होणार आहे.