राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST2021-07-30T04:20:36+5:302021-07-30T04:20:36+5:30

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, विभागीय अध्यक्ष अविनाश चव्हाण यांच्या मान्यतेने, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष संग्राम ...

District Executive of NCP Students Congress announced | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, विभागीय अध्यक्ष अविनाश चव्हाण यांच्या मान्यतेने, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष संग्राम गांवडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल काळणे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये जिल्हा सचिवपदी चंद्रकांत तरोळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. सुशांत गावंडे, जिल्हा संघटक ऋषभ भास्कर, जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर अवचार, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख ॲड. संदेश वानखडे, जिल्हा महासचिव शंतनू ढोले, जिल्हा संपर्कप्रमुख शुभम काळे, आदींची नियुक्ती करण्यात आली, तर अकोला तालुकाध्यक्षपदी राहुल वाकोडे, अकोट तालुका अध्यक्षपदी विशाल म्हसणे, शहराध्यक्ष प्रज्वल रावस्कर, तेलारा तालुका अध्यक्षपदी यश अवचार शहराध्यक्ष प्रसाद खाडे, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष अपूल राठोड, शहराध्यक्ष शरदरशहा इस्माईल शहा, बाळापूर तालुका अध्यक्षपदी आतिश संजय बकाल, पातूर तालुका अध्यक्षपदी मो. जुनेद मा अफजल, मूर्तिजापूर तालुका अध्यक्षपदी अतुल गावंडे, शहराध्यक्षपदी पुष्पक डोंगरे, आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: District Executive of NCP Students Congress announced