शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसंबंधी खासदारांची अधिका-यांसोबत चर्चा

By admin | Updated: January 11, 2015 01:10 IST

अकोला मार्गे नवीन गाड्या सुरू करण्याचे प्रस्ताव.

अकोला- दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी नांदेड येथे खासदारांसोबत रेल्वेसंबंधी विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी अकोल्यातील रेल्वे स्थानकांच्या समस्यांकडे खासदार संजय धोत्रे यांनी रेल्वे अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. तसेच काही गाड्यांचे दिवस वाढविणे तर काही नवी गाड्यांचे प्रस्ताव अधिकार्‍यांना देण्यात आले. नांदेड येथे गुरुवारी झालेल्या या बैठकीला खासदार संजय धोत्रे यांच्यासोबत विदर्भ चेंबरचे माजी अध्यक्ष व रेल्वेचे डीआरयूसीसी सदस्य वसंत बाछुका उपस्थित होते. खासदार आणि अकोल्यातील रेल्वे प्रतिनिधींनी रेल्वे अधिकार्‍यांपुढे येथील समस्या मांडल्यात. यात प्रामुख्याने रखडलेल्या गेज परिवर्तनाच्या कामाचा समावेश होता. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ हे मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ व ३ सोबत जोडणे, दक्षिण-मध्य रेल्वेच्या अकोला स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था व कव्हर शेड बसविणे, दुसर्‍या क्रमांकाच्या ओव्हर ब्रिजला सातव्या प्लॅटफार्मपर्यंंत वाढविणे, अकोला रेल्वे स्थानकावर पीआयटी लाइनचा विकास करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय यशवंतपूर-बंगलोर गाडी आठवड्यातून दोन वेळा, सिकंदराबाद-जयपूर गाडी आठवड्यातून दोन वेळा, हैदराबाद अजमेर, अमरावती-तिरूपती गाडी आठवड्यातून तीन वेळा आणि नांदेड-श्रीगंगानगर गाडी दररोज चालविण्याचा प्रस्ताव खासदार आणि बाछुका यांनी रेल्वे अधिकार्‍यांना दिला. नांदेड- नवी दिल्ली ही नवीन गाडी पूर्णा, अकोला, भुसावळ मार्गे सुरू करणे, सिकंदराबादकरिता पूर्णा, अकोला, जळगाव, औरंगाबाद-नागपूर गाडी पूर्णा, अकोला मार्गे गाडी सुरू करणे, रात्रीच्या प्रवासाकरिता अकोला-सिकंदराबाद-हैदराबाद-काचीगुडा गाडी सुरू करणे, अकोला, परभणी, जालना, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद गाडी सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अकोला मार्गे धावणार्‍या गाड्यांचा वेग वाढविणे आणि तिरुपती-अमरावती व नांदेड-श्रीगंगानगर या लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये पेन्ट्रीकार सुरू करण्याची मागणी करण्यात आली.