पळशी बु.(खामगाव) : खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील ४० वर्षीय शेतकर्याने अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील थार येथील त्याच्या सासरवाडीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील ४० वर्षीय शेतकरी राजेंद्र रामराव उमाळे या शेतकर्याने स्वत:च्या शेतावर पीककर्ज काढले होते; मात्र सततच्या नापिकीमुळे ते कर्जाची परतफेड करू शकले नाही. तेल्हारा तालुक्यातील थार येथील रहिवासी त्यांचे सासरे नामदेव फोकमारे यांच्या घरी त्यांनी २५ मे रोजी सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान २६ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}