उष्माघाताने एकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 29, 2015 01:46 IST2015-05-29T01:46:50+5:302015-05-29T01:46:50+5:30

४८ वर्षीय इसमाचा उष्माघाताने मृत्यू; मेहकर येथील घटना.

The death of one by heat | उष्माघाताने एकाचा मृत्यू

उष्माघाताने एकाचा मृत्यू

मेहकर (जि. बुलडाणा) : स्थानिक मातंगपुर्‍यातील रहिवासी एका ४८ वर्षीय इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास येथील इमामवाडा चौकात घडली. मातंगपुरा येथील शे. शरीफ शे. फाजल कुरेशी हा गेल्या अनेक वर्षांपासून शहरात तळलेले पापड विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता. दिवसभर पापड विकून सायंकाळी पापड तळण्यासाठी तेल घरी घेऊन जात असताना इमामवाडा चौकात तो अचानक भोवळ येऊन पडला. दरम्यान, त्याला एका रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्यावर गेले आहे. नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यावरही दुपारच्या दरम्यान शुकशुकाट दिसून येत आहे. जिल्ह्यात उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची संख्या वाढत असून, जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍यांची संख्या वाढत आहे.

Web Title: The death of one by heat