विजेच्या झटक्याने शेतक-याचा मृत्यू

By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-11T01:38:58+5:302015-07-11T01:38:58+5:30

बाळापूर तालुक्यातील नागद येथे घडली घटना.

The death of the farmer by electric shock | विजेच्या झटक्याने शेतक-याचा मृत्यू

विजेच्या झटक्याने शेतक-याचा मृत्यू

कवठा (जि. अकोला ): विजेच्या झटक्याने युवा शेतकरी दिनेश देवमन वाकडे (२६)यांचा गुरुवारी मृत्यू झाल्याची घटना दुपारी बाळापूर तालुक्यातील नागद येथे घडली. ते विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत खांबावर चढले होते. विद्युत खांबावर दुरुस्ती करताना वायरमनाचा मृत्यू झाल्याच्या, भाजल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. बाळापूर तालुक्यातील हाता येथे खासगी वायरमन कंचन मोतीराम दामोदर (वय ४८) यांचाही सोमवारी मृत्यू झाला होता. ते विद्युत खांबावर चढले असता विजेचा धक्का लागल्याने ते जमिनीवर कोसळले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना ताजी असतानाच गुरुवारी दोघांना विद्युत शॉक लागल्याच्या घटना घडल्या. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागद येथील युवा शेतकरी दिनकर वाकडे हे रोहित्राजवळ गेले. त्यानंतर ते विद्युत खांबावर चढले; मात्र त्यांना शॉक लागला. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने खांबावरून उतरविले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. .

Web Title: The death of the farmer by electric shock