शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

एक पहाट - निर्मळ विचारांची

By admin | Updated: October 28, 2014 00:49 IST

‘लोकमत’चा नेहरु पार्कमध्ये अनोखा दीपोत्सव.

अकोला : एक पहाट क्रांतीची.. एक पहाट विचारांची.. एक पहाट समृद्घीची.. एक पहाट बदलांची.. एक पहाट सर्मपणाची.. एक पहाट तुमच्या आमच्या मनातील निर्मळ विचारांचीह्ण हा संदेश देत गुरुवार, २३ ऑक्टोबरला ह्यलोकमतह्णच्या वतीने अनोखा दीपोत्सव नेहरू पार्क येथे पार पडला. सामाजिक विचारांच्या आदान-प्रदानासोबतच पहाटे वाहणार्‍या शीतल वार्‍यासोबतच सुमधुर संगीताची मैफील रसिकांना एक वेगळाच आनंद देऊन गेली.लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट, बाल विकास मंच, नेहरू पार्क, शंकर साउंड सर्व्हिस, नाना उजवणे परिवार, प्रवीण क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त ह्यदिवाळी पहाटह्ण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या रम्य पहाटे वातावरणात हवाहवासा गारवा असताना नेहरू पार्कच्या हिरव्यागार लॉनवर दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पहाटे ५ वाजता हजारोंच्या संख्येने पणत्या लावण्यात आल्या होत्या. या पणत्यांच्या प्रकाशाने संपूर्ण नेहरू पार्क उजळून टाकले होते. वासुदेवाच्या रूपात आलेल्या भक्ती ठक्कर हिने एक पणती लावून यास सुरुवात केली. नंतर सर्व उपस्थितांनी पणत्या लावून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या पणत्यांच्या माध्यमातून ह्यपाणी वाचवाह्ण हा जनजागृतीपर संदेश देणारा उत्कृष्ट देखावा जितेंद्र डहाके यांनी सादर केला. उ त्कृष्ट रांगोळय़ा काढून प्रवीण पवार यांनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली होती.