शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत भवनसमोर अंधार; नागरिकांची महावितरणच्या कार्यालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:17 IST

न्यू भागवत प्लॉट परिसरात रोज ८ ते १० तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी शनिवारी महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरण कंपनीचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोरील न्यू भागवत प्लॉट परिसरात रोज ८ ते १० तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी शनिवारी महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली. नागरिकांनी मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर केले, तसेच संबंधित अभियंत्यास समज देऊन ही समस्या िनकाली काढावी, अशी मागणी केली आहे.सध्या पावसाळ्याच्या दिवसात थोडी जरी हवा सुटल्यास, पाऊस आल्यास अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित होतो. अनेक भागात वायरवर झाडांच्या फांद्या पडत असल्याने वायर तुटण्याच्या घटनाही नित्याच्याच झाल्या आहेत. जुने शहरात तर अनेक ठिकाणी वायर कमी उंचीवर असल्याने जड वाहनांमुळे वायर तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, विद्युत खंडित होण्याचा प्रकार आता तर महावितरणचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन परिसरातही घडत आहे. न्यू भागवत प्लॉट परिसरातील नागरिक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी मुख्य अभियंत्यांकडे धाव घेऊन समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी राजेश पाटील, विनोद लाहोटी, अर्चना पांडे, अशोक झंवर, तुषार सोमाणी, दिनेश गाढे, दीप्ती जोशी, मंजिरी काळे, उमेश पोपट, शशांक परमार, चिमनभाई दोडिया, पुरुषोत्तम अग्रवाल, सतीश सहस्त्रबुद्धे, नवलचंद कोचेरा, तुषार मालविय, प्रकाश काळे, चंद्रकांत देशमुख, सुरतसिंह ठाकूर, वसंत सोनोने, डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रकाश मारडिया हे निवेदन देण्यासाठी गेले होते. रात्री रस्त्यावर अंधाराचे साम्राज्यन्यू. भागवत प्लॉट परिसरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. अनेकदा रात्री अचानक विद्युत पुरवठा खंडित असल्याने पथदिवेही बंद होतात. अशा वेळी एखाद्या रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाताना त्यांच्या नातेवाइकांची कसरत होते. रात्री विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने चोरट्यांचे फावले असून, नागरिकांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचे प्रकार घडत आहेत. हलगर्जी करणाऱ्या अभियंत्यांवर वरिष्ठ का कारवाई करीत नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.टोल फ्री नंबर त्रासदायकविद्युत पुरवठा खंडित झाल्यास या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधल्यास ग्राहकाला ग्राहक क्रमांक नोंदवण्यास सांगण्यात येते. त्यानंतर १५ ते २० मिनिट प्रतिसाद देत नाही. नंतर कॉल ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे ट्रान्सफर केला जातो. अनेकदा ग्राहक सेवा प्रतिनिधी तक्रार नोंदवली असे सांगतात, मात्र तक्रार क्रमांकच देत नाहीत. तक्रारकत्यार्ने मागणी केल्यानंतरही त्याला तक्रार क्रमांक न देता ह्यतुमची तक्रार संबंधितांकडे फॉरवर्ड केली आहेह्ण, असे सांगून फोन बंद करतात, असा प्रकार अनेक तक्रारकर्त्यांसोबत घडला आहे.