गुंगीच्या द्रव्यांची ग्रामस्थांमध्ये धास्ती

By Admin | Updated: July 14, 2014 01:25 IST2014-07-14T00:11:01+5:302014-07-14T01:25:03+5:30

घराच्या बाहेर असलेल्या कुलरच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून लुटमार करीत असल्याच्या अफवेची ग्रामस्थांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

Dangers are scared of villagers | गुंगीच्या द्रव्यांची ग्रामस्थांमध्ये धास्ती

गुंगीच्या द्रव्यांची ग्रामस्थांमध्ये धास्ती

अकोला: ग्रामीण भागात 'बाईकर्स गॅँग' घराच्या बाहेर असलेल्या कुलरच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून लुटमार करीत असल्याच्या अफवेची ग्रामस्थांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे अनेकांनी कुलर बंद केले आहेत. अनेक दिवसांपासून ग्रामीण भागात बाईकर्स गॅँगच्या अफवेमुळे ग्रामस्थ हैराण आहेत. अनेक ठिकाणी भुराट्या चोरट्यांनी हैदोस घातला आहे. जिल्ह्यात गत १३ दिवसांत चोरीच्या ३५ पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. या बाईकर्स गॅँगच्या अफवेमुळे ग्रामस्थ रात्री हातात काठय़ा घेऊन गस्तही घालत आहेत. बाईकर्स गॅँगच्या अफवेमुळे ग्रामस्थांनी वेगळीच धास्ती घेतली आहे. ही गॅँग घराबाहेरील कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकते. त्यामुळे घरात झोपलेल्यांना लवकर जाग येत नाही. या अफवेमुळे अनेकांनी कुलर बंद केले आहेत.

Web Title: Dangers are scared of villagers