शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

..उडान तो हौसलो से होती है

By admin | Updated: November 24, 2014 01:15 IST

मूकबधिर, अपंग मुलांच्या नृत्याविष्काराने भारावले सभागृह.

अकोला: चित्रपट, लोकगीतांवर थिरकणारी चिमुकली पावलं, सामाजिक अनिष्ट रूढी परंपरा, भरकटलेली खाद्य संस्कृती या नाटकांमधून सामाजिक संदेश देणारे मूकबधिर मुलांचे अडखळते आवाज, पात्राशी असलेली एकरूपता, त्यांच्यामधील जिद्द पदोपदी दर्शवित होती की, सपने उनके पुरे होते जिनके सपनो मे जान होती है, पंख होनेसे कुछ नही होता, उडान तो हौसलो से होती है. रविवारी सायंकाळी मूकबधिर व अपंग मुलांनी सादर केलेल्या नृत्य कलाविष्काराने संपूर्ण सभागृह भारावले होते. कार्यक्रमाला असलेली श्रोत्यांची खच्चून गर्दी अन् प्रत्येक नृत्यावर, नाटकावर मिळत असलेली टाळ्यांची साद मुलांचा उत्साह द्विगुणीत करीत हो ती. एकवीरा मल्टी पर्पज सोसायटीच्यावतीने मूकबधिर मुले व पालकांचा स्नेहमीलन सोहळा २३ नोव्हेंबर रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकवीरा मल्टी पर्पज फाऊंडेशनचे संस्थापक प्रल्हादराव बनसोड होते, उद्घाटक म्हणून हरेश शाह होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. नानासाहेब चौधरी, ठाणे डेफ वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव घैघास, इनरव्हिल क्लब ऑफ अकोला क्विन्सचे जसलीन साहनी, संस्थेच्या मानद वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती रेंगे, एकवीरा मल्टी पर्पज फाऊंडेशनच्या सचिव डॉ. स्नेहल कलोरे यांची उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला एकदन्ताय, वक्रतुंडाय, गौरीतनया या गीतावर नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर भाजीपाल्याचे महत्त्व सांगणारी नाटिका चिमुकल्या मुलांनी सादर केली. अग्गं बाई, ढग्गो बाई व गवळण नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. प्रत्येक फळाचे महत्त्व सांगणार्‍या नाटिकेत चिमुकल्या मुलांनी साकारलेली राजा व प्रधानांची भूमिका तसेच त्यांनी परिधान केलेल्या पोषाखातून त्यांची पात्राबद्दलची आत्मीयता दिसत होती. यानंतर मुलांनी रघुपती राघव राजाराम या गीतावर नृत्य सादर केले. संचालन उपकार्यकारी अभियंता सुशील जयस्वाल व महाराष्ट्र बँकेच्या उपप्रबंधक शेफाली जयस्वाल यांनी केले.