शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; हजारो भाविकांनी घेतले दर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 4:14 PM

Kartik Swami Temple News दरवर्षी कृतिका नक्षत्रात पौर्णिमेला हे मंदिर वर्षातून एकदाच दर्शनासाठी उघडले जाते.

ठळक मुद्देकृतिका नक्षत्रात पौर्णिमेला हे मंदिर वर्षातून एकदाच दर्शनासाठी उघडले जाते. यावर्षी  कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग २९  नोव्हेंबर रविवार रोजी आला. यानिमित्ताने पंचक्रोशीतल हजोरो भाविक दर्शनासाठी मूर्तिजापूर दाखल झाले.

मूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती देवरण रोडवरील माजी नगराध्यक्ष दादासाहेब जमादार यांच्या शेतातील मार्कण्डेश्वर मंदिराच्या तळभागात भगवान कार्तिकेय स्वामीची सुरेख व सुंदर संगमरवरी षडमुखी मूर्ती आहे. दरवर्षी कृतिका नक्षत्रात पौर्णिमेला हे मंदिर वर्षातून एकदाच दर्शनासाठी उघडले जाते. रविवारी कृतिका नक्षेत्रात भाविकांसाठी हे मंदिर उघडण्यात आले. त्यावेळी दर्शना करीता हजारो भाविकांनी एकच गर्दी करून दर्शनाचा लाभ घेतला.               येथील मंदिरात दरवर्षी आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात यावर्षी  कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग २९  नोव्हेंबर रविवार रोजी आला. यानिमित्ताने पंचक्रोशीतल हजोरो भाविक दर्शनासाठी मूर्तिजापूर दाखल झाले.  हे धार्मिक स्थळ कानपुरचे नागा निर्वाण महाराज, अक्कलकोटचे श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या व्यासपीठावर विराजमान व चतुर्थ महाराज पुरुष श्री.गजानन महाराज,चिखली चे संत मौनीबाबा,मूर्तिजापुरचे संत बद्रीनाथ महाराज आदीच्या सहवासाने पावन झालेले आहे. तसेच या ठिकाणी मार्कण्डेश्वर मंदिरात महादेवाची पिंड व पिंडीला घट्ट मिठी मारून शरणागत बाल मार्कण्डे ऋषीची संगमरमरी मूर्ती आहे. समोरच यमराज देवतेची काळया पाषाणाची मूर्ती आहे. येथे प.पु.बद्रीबाबा महाराज,प.पु.बँक बाबा महाराज, श्री.बलदेव महाराज, वैध महाराज आदी संताची समाधी आहे. यावर्षी कार्तिक पोर्णिमा ३० नोव्हेंबर सोमवारी आहे. परंतु भगवान कार्तिकेय दर्शनासाठी मुहूर्त २९ नोव्हेंबर रोजी आहे. रविवारी कृतिका नक्षत्रात आल्याने दिवसभर मंदिर दर्शनासाठी उघडल्या गेले. १९४२ मध्ये या मंदिराची निर्मिती असून या मंदिरात तळघर वर्षेभर (भूयार) नैसर्गिक प्रवाहाच्या पाण्याने भरलेले असते. रविवारी मंदिर उघडल्या नंतर त्यातील पाणी बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती दादासाहेब जमादार यांनी दिली. जिल्ह्य़ातील हे एकमेव मंदिर असून यात नैसर्गिक प्रवाहाने पाणी साचल्या जात असल्याने मंदिराचे अधिक महत्व आहे. या मंदिराचे विशेष महत्त्व असल्याने मी अकोट येथून सहपरीवार कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी येथे आलो आहे. दर्शन घेतल्या नंतर मन प्रसन्न झाले यापुढे दरवर्षी दर्शनाला आम्ही येणार आहेत.संदीप पाटील, भाविक, अकोट  कृतिका नक्षत्र हा दिवस कार्तिक स्वामींचा जन्म दिवस मानला जातो. येथे कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर असल्याने विदर्भातील व इतरही राज्यातून येथे दर्शनासाठी दरवर्षी येतात. या मंदिराचे महत्त्व म्हणजे जिथे कार्तिक स्वामींची मुर्ती आहे ते तळ घर बाराही महिने पाण्याने भरलेले असल्याने याचे विशेष महत्त्व मानल्या जाते.- सुनील शर्माआयोक, कार्तिक स्वामी मंदिर, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला