शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: July 29, 2014 20:16 IST

नद्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्यातील गौतमा, पूर्णा व विद्रुपा नदीकाठच्या लोकांना त्याची झळ पोहचली असून, ४ हजार हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा महसूल विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

तेल्हारा: संततधार पावसानंतर नद्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्यातील गौतमा, पूर्णा व विद्रुपा नदीकाठच्या लोकांना त्याची झळ पोहचली असून, ४ हजार हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा महसूल विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर तालुक्यात दमदार पावसाचे आगमन झाले. संततधार पावसामुळे तालुक्यातील गौतमा, आस, विद्रुपा, पूर्णा या नद्यांसह नाल्यांना पूर आला. त्यामुळे नदीकाठच्या शेतांमधील नवांकुरित पिकांचे मोठे नुकसान झाले. अडगाव, मालठाणा, बेलखेड, पाथर्डी, तेल्हारा बु. , कोठा, भांबेरी, खापरखेड, पिवंदळ, सांगवी, नेर, खेल सटवाजी, खेल कृष्णाजी, दापुरा, उमरी, खाकटा, खेल देशपांडे, उबारखेड, मनात्री खुर्द, मनात्री बु., तळेगाव डौला, तळेगाव पातुर्डा, आडसुळ, बांबर्डा या गावांमधील नदीकाठच्या शेतातील पिके वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मनात्री, मालपुरा व तेल्हारा येथील काही जणांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली. तालुक्यातील चार हजार हेक्टर जमिनीवरील कपाशी, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे. निंभोरा खुर्द व हिंगणी बु. येथील नदीवरील पूल वाहून गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. पीक नुकसानीचा सर्व्हे येत्या दोन दिवसांत होणार आहे. शासनाने नुकसानीची मदत त्वरित जारी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.