शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचा पेरा वाढणार !

By admin | Updated: May 14, 2017 04:15 IST

यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेत मशागतीच्या कामांना वेग आला

अकोला : यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेत मशागतीच्या कामांना वेग आला असून, शेतकरी बियाण्यांचे नियोजन करण्यावर भर देत आहेत. कृषी विभागानेही पावसाच्या भाकितानुसार पीक नियोजन केले असून, विभागात कपाशीची पेरणी वाढेल, तर सोयाबीनचा पेरा दोन ते तीन टक्क्यांनी घटण्याचा अंदाज वर्तविला आहे.मागच्या वर्षी अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत सोयाबीनची पेरणी १३ लाख ५0 हजार हेक्टरच्यावर झाली होती. उत्पादनही बर्यापैकी झाले; पण उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाले नाही, हमीदरापेक्षा कमी दराने शेतकर्यांना सोयाबीन विकावे लागले. याचा परिणाम यावर्षी सोयाबीन पेरणी कमी होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. कापसाला यावर्षी चांगले दर मिळाले आहेत. उताराही एकरी सरासरी ८ ते १२ क्विंटलपर्यंत लागला आहे. त्यामुळे कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे नियोजनही कृषी विभागाने केले आहे. तूर पीक वाढीबाबत साशंकता आहे. कापूस आणि सोयाबीन पिकात शेतकरी तुरीची पेरणी करीत असतात. विभागातील एकूण खरिपाच्या ३२ लाख हेक्टरपैकी मागच्या वर्षी तुरीचे क्षेत्र पाच लाख हेक्टरपर्यंत पोहोचले होते; पण दरच मिळाले नसल्याने यावर्षी या पिकाबाबत शेतकरी य पिकाबाबात मागच्या वर्षीएवढे अनुकूल नसल्याचे चित्र आहे. पाऊस वेळेवर आला तर मात्र मूग, उडिदाची पेरणी मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यासाठीचे बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहेत; पण मागील वर्षी मूग ऐन फुलोर्यावर असताना पावसाचा खंड पडला होता. त्याचे प्रतिकूल परिणाम या पिकावर होऊन उत्पादनात घट झाली होती. मुगाचे दरही बाजारात बर्यापैकी असल्याने शेतकर्यांना वेळेवर पावसाची प्रतीक्षा आहे.अकोला जिल्हय़ातील खरिपाचे क्षेत्र ४ लाख ८0 हजार हेक्टर आहे. यावर्षी जिल्हा कृषी विकास अधिकार्यांनी जिल्हय़ाचे नियोजन केले असून, यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्हय़ात यावर्षी बियाणे मुबलक आहेत.