कापूस घरात; शेतकरी संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 06:14 PM2020-05-17T18:14:58+5:302020-05-17T18:15:13+5:30

जिल्ह्यातील २३ हजार २७८ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया अद्याप रखडली आहे.

Cotton in house; Farmers in crisis! | कापूस घरात; शेतकरी संकटात!

कापूस घरात; शेतकरी संकटात!

Next

- संतोष येलकर
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाऊन ’च्या पृष्ठभूमीवर कापूस विकण्यासाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी केल्यानंतरही जिल्ह्यातील २३ हजार २७८ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया अद्याप रखडली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना कापूस घरातच असल्याने, कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
भारतीय कापूस निगम (सीसीआय)मार्फत कापूस खरेदीसाठी जिल्ह्यातील २९ हजार ४६५ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्यापैकी १४ मेपर्यंत २ हजार ३४९ शेतकºयांकडून ४४ हजार ५४५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, अद्याप २२ हजार ११५ शेतकºयांचा कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया बाकी आहे. तसेच मार्केटिंग फेडरेशनकडे आॅनलाइन नोंदणी केलेल्या १ हजार ९५१ शेतकºयांपैकी ७८८ शेतकºयांचा २२ हजार ९९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, १ हजार १६३ शेतकºयांकडील कापूस खरेदी करणे बाकी आहे. सीसीआय आणि फेडरेशनमार्फत कापूस खरेदीसाठी जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी एकूण २३ हजार २७८ शेतकºयांचा कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया रखडली आहे. ‘कोरोना’ संकटाच्या परिस्थितीत पावसाळा तोंडावर आला असताना कापूस घरातच पडून असल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

‘सीसीआय’मार्फत कापूस खरेदी रखडलेले असे आहेत शेतकरी!
केंद्र                                  शेतकरी
अकोला                            ५९४६
अकोट                               ६८७४
तेल्हारा                              २८०९
बाळापूर                             २५९८
पातूर                                १०७३
बार्शीटाकळी                    १२५२
मूर्तिजापूर                          १५६३
...................................................
एकूण                              २२११५

१७५ क्विंटल कापूस घरात पडून; कर्जाची परतफेड कशी करणार?
‘सीसीआय’मार्फत कापूस खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे; मात्र अद्याप कापूस खरेदी करण्यात आला नाही. त्यामुळे १७५ क्विंटल कापूस घरातच पडून आहे. कापूस खरेदी रखडल्याने जवळ पैसा नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड आणि पेरणीसाठी बियाणे व खतांचा खर्च कसा भागवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी व्यथा कापशी येथील कापूस उत्पादक शेतकरी विजय चतरकर यांनी बोलून दाखविली.

कापूस विकण्यासाठी गत २१ एप्रिल रोजी नोंदणी केली; परंतु अद्याप कापूस खरेदी करण्यात आला नाही. ८० क्विंटल कापूस घरातच असल्याने पैसा नसल्याच्या स्थितीत तोंडावर आलेल्या पेरणीचा खर्च कसा भागवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- विजय तालोट,
कापूस उत्पादक शेतकरी, आखतवाडा.

 

Web Title: Cotton in house; Farmers in crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.