शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Efect : सायकल रिक्षांचे पायडलच थांबले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:43 IST

कोरोनामुळे या गरीब रिक्षा चालकांवर मोठे संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देशहरामध्ये २५0 ते ३00 सायकल रिक्षा चालक आहेत. प्रवासीच नसल्यामुळे रिक्षा थांबविणे भाग पडले आहे.

- नितीन गव्हाळे  अकोला: आॅटोरिक्षा, टॅक्सीमुळे शहरातील तीनचाकी सायकल रिक्षांची संख्या कमी झाली असली तरी, सद्यस्थितीत शहरामध्ये २५0 ते ३00 सायकल रिक्षा चालक आहेत. पायडल मारून सायकल रिक्षा चालविणे हे श्रमाचे काम आहे; परंतु कोरोनामुळे या गरीब रिक्षा चालकांवर मोठे संकट कोसळले आहे. प्रवासीच नसल्यामुळे रिक्षा थांबविणे भाग पडले आहे. त्यामुळे पोटाची खळगी तरी कशी भरावी, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, अशी चिंता पायडल रिक्षा चालकांना सतावत आहे.एकेकाळी पायडल रिक्षाच शहरात धावायच्या. त्यासाठी रिक्षा चालकांना मोठे शारीरिक श्रमसुद्धा घ्यावे लागत. एवढे शारीरिक श्रम घेतल्यानंतरही २00 ते ३00 रुपये दिवसाकाठी मजुरी पडायची. हळूहळू काळ बदलत गेला. सायकल रिक्षाची जागा आॅटोरिक्षा, टॅक्सीने घेतली. पायडल रिक्षा हळूहळू मागे पडला. प्रवासीसुद्धा पायडल रिक्षाऐवजी आॅटोरिक्षा, टॅक्सीला प्राधान्य देऊ लागले. असे असले तरी शहरामध्ये सद्यस्थितीत २५0 च्यावर पायडल रिक्षा आहेत. रिक्षा चालवून पोटाची खळगी भरण्यासाठी हे चालक दिवसभर श्रम करताना दिसतात; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली. या संचारबंदीमुळे त्यांच्या रिक्षांचे पायडलच थांबले आहे. रोजगार, मजुरी बुडत असल्याने जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसा उरलेला नाही. अशा परिस्थितीत या रिक्षा चालकांना निर्वासितांचे जिणे जगावे लागत आहे. काहींनी तर शाळांमधील मनपाने निर्माण केलेल्या मदत केंद्रामध्ये आश्रय घेतला आहे. प्रशासनाने आम्हा रिक्षा चालकांना मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे.गत २५ वर्षांपासून सायकल रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. मुलांचे शिक्षण केले. कोरोनामुळे तर आमची रोजीरोटीच हिसकावल्या गेली आहे. खायला अन्न नाही. खिशात पैसा नाही. अशा परिस्थितीत करावे काय, सुचत नाही. सध्या दानशूरांनी केलेल्या अन्नदानातून कसेबसे भागविण्याची धडपड सुरू आहे. शासनाने आम्हाला मदत करावी.-अरुण रूपचंद बोरसे,सायकल रिक्षा चालक

४0 वर्षांपासून सायकल रिक्षा चालवून पोट भरत आहे; परंतु असा कठीण प्रसंग आतापर्यंत कधी ओढावला नाही. गत काही वर्षांमध्ये अनेक संकटे आली आणि गेली. कोरोनामुळे तर आम्हाला देशोधडीला लावले. स्वाभिमानाने रिक्षा चालवून पोट भरणारे आम्ही, आता निर्वासितासारखे जिणे जगत आहोत.-मंकुराम आसोले,सायकल रिक्षा चालक.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस