शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मूर्तिजापुरातील दोन्ही रुग्ण निगेटिव्ह; आणखी चार संशयित दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:20 IST

आणखी चार संशयित रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल झाल्याने एकूण संशयितांची संख्या 35 वर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात तर दररोज संशयित रुग्ण दाखल होत आहेत.सोमवारी दाखल झालेल्या दोघांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले.४४ जण अजूनही ‘होम क्वारंटीन’मध्ये आहेत.

अकोला : मूर्तिजापूर येथील दोन्ही संशयित रुग्णांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर अकोट येथील एकाचा अहवाल प्रलंबित आहे. अशातच सोमवारी आणखी चार  संशयित रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल झाल्याने एकूण संशयितांची संख्या 35 वर पोहोचली आहे. त्यापैकी ३० जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात तर दररोज संशयित रुग्ण दाखल होत आहेत; परंतु आतापर्यंत दाखल रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी दररोज संशयित रुग्ण दाखल होत आहेत; ही चिंता वाढवणारी बाब आहे. सोमवारी दाखल झालेल्याचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत, त्यामुळे आता तिघांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना योग्य सुरक्षा मिळत नसल्याने त्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

८२ लोक ‘होम क्वारंटीन’मधून मुक्तविदेशातून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांपैकी ८२ जणांचा होम क्वारंटीन पूर्ण झाल्याने त्यांना होम क्वारंटीनमधून मुक्त करण्यात आले आहे. तर ४४ जण अजूनही ‘होम क्वारंटीन’मध्ये आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष असले, तरी यातील बहुतांश लोक सोशल डिस्टंसिंग पाळत नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर