शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola :  आणखी दोघांचा मृत्यू; १०८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:29 IST

मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मोरगाव उरळ येथील ५० वर्षीय महिलेसह अकोट येथून ७९ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णवाढीचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी आणखी १०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, दोघांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह अहवालामध्ये ९० अहवाल आरटीपीसीआर, तर १८ अहवाल रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टचे आहेत. त्यामुळे आतापर्यंत बाधितांचा आकडा ६,९४२ वर पोहोचला, तर मृत्यूचा आकडा २१७ वर पोहोचला आहे.गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यावर नियंत्रणासाठी प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्या तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचे सत्र थांबता थांबेना. गुरुवारी त्यात आणखी दोघांची भर पडली. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मोरगाव उरळ येथील ५० वर्षीय महिलेसह अकोट येथून ७९ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. हे दोन्ही रुग्ण २० सप्टेंबर रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले होते. तर दुसरीकडे १०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालामध्ये सिव्हिल लाइन, खदान व मोरगाव भाकरे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच सायंकाळी प्राप्त अहवालामध्ये ३३ महिला व ५४ पुरुष आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील ११ जण, कुटासा व जीएमसी येथील प्रत्येकी नऊ जण, लेडी हार्डिंगजवळ येथील चार जण, कौलखेड, खदान, जठारपेठ, अकोट व लहान उमरी येथील प्रत्येकी तीन जण, अकोट फैल, मंडुरा, शात्री नगर, वानखडे नगर, गोरक्षण रोड, मोठी उमरी, रेणुका नगर, सिंधी कॅम्प व सिरसो येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बार्शीटाकळी, महसूल कॉलनी, बायपास, लक्ष्मी नगर, चांदूर, डाबकी रोड, देवरावबाबा चाळ, बाळापूर, कान्हेरी गवळी, बोरगाव मंजू, कच्ची खोली, शिवणी, खिरपूर, हिंगणा रोड, अंबिका नगर, खडकी, बळीराम चौक, किनखेड, मोरगाव भाकरे, खोलेश्वर व दहीहांडा येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. सद्यस्थितीत १,५६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

१९९ जणांना डिस्चार्जगुरुवारी एकूण १९९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ४० जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून नऊ जण डिस्चार्ज देण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथील आठ जण, हॉटेल व खासगी रुग्णालयातून १५, आयुर्वेदिक महाविद्यालय येथून दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आले. तसेच होम क्वारंटीनचा कालावधी पूर्ण करणारे १२५, अशा एकूण १९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला