Corona Cases in Akola : आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 18:35 IST2021-07-21T18:34:54+5:302021-07-21T18:35:01+5:30

Corona Cases in Akola: आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७,७३१ झाली आहे.

Corona Cases in Akola: Seven more corona positive | Corona Cases in Akola : आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola : आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह

अकोला : जिल्ह्यात बुधवार, २१ जुलै रोजी आरटीपीसीआ चाचण्यांमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७,७३१ झाली आहे. दरम्यान, तीन जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३३६ तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी बार्शिटाकळी येथील दोन, तर अकोला शहरातील पाच अशा सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर उर्वरित ३२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. मंगळवारी करण्यात आलेल्या ६१० रॅपिड चाचण्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही.

 

४७ ॲक्टिव्ह रुग्ण

बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनावर मात करणार्यांची संख्या ५६,५५१ झाली आहे. आता केवळ ४७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Corona Cases in Akola: Seven more corona positive